ठाकरे सरकारने काल अनेक निर्बंध काढले. कार्यालयांना १००% उपस्थिती लावायला सांगितली आहे. परंतु सरकारने मुंबईची ‘लाईफलाईन’ असलेल्या मुंबई लोकलला मात्र अजूनही सामान्य नागरिकांपासून दूरच ठेवले आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून ठाकरे सरकारवर टीका होत आहे. विरोधीपक्ष देखील या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर हल्ला चढवत आहेत. भाजपाचे आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी देखील या मुद्द्यावर ट्विट करत ठाकरे सरकारला घेरले आहे.
“सर्वांत आवश्यक लोकलप्रवासाला परवानगी न देता ठाकरे सरकारने कठोरतेचा कळस गाठला आहे. ऑफिसांमध्ये १००% उपस्थिती लावायची असेल, तर कर्मचारी लोकलविना पोचणार कसे? हे सरकार आता चिठ्ठी काढून निर्बंध-अनिर्बंधचा खेळ खेळतेय.” असं ट्विट अतुल भातखळकरांनी केलं आहे.
सर्वांत आवश्यक लोकलप्रवासाला परवानगी न देता ठाकरे सरकारने कठोरतेचा कळस गाठला आहे. ऑफिसांमध्ये 100% उपस्थिती लावायची असेल, तर कर्मचारी लोकलविना पोचणार कसे? हे सरकार आता चिठ्ठी काढून निर्बंध-अनिर्बंधचा खेळ खेळतेय. #mahanapasaghadi pic.twitter.com/goZq7V3FAO
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 3, 2021
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र आहे. मात्र, कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा धोका अद्याप कायम असल्याचं सांगण्यात येत आहे. अशावेळी राज्य सरकारनं एक महत्वाचा निर्णय घेतलाय. राज्य सरकारने कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेल्या २२ जिल्ह्यात मोठी शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. तर ११ जिल्ह्यात लेवल ३ चे निर्बंध कायम राहणार आहेत. नव्या नियमानुसार २२ जिल्ह्यात सोमवार ते शुक्रवारी रात्री ८ वाजेपर्यंत सर्व दुकानं सुरु ठेवता येतील. तर शनिवारी दुपारी ३ पर्यंत दुकानं सुरु ठेवण्यास मुभा असेल. मात्र रविवारी पूर्णत: बंद असेल. सरकारच्या या नियमावलीमध्ये मुंबई लोकल रेल्वेचा कुठेही उल्लेख नाही.
हे ही वाचा:
हॉकीतील पराभवावर काय म्हणाले मोदी?
सगळं खुल केलं मग मंदिर का बंद?
सर्वांच्या पाठीवर ‘शिव पंख’ लावा
‘या’ देशात झाला मोठा दहशतवादी हल्ला
लसीचे दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी अनेक विरोधी पक्ष सातत्याने करत आहेत.