सरकार कोरोनाबाबत गंभीर नाही

सरकार कोरोनाबाबत गंभीर नाही

भाजपाचे नेते नारायण राणे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी सरकारवर विविध मुद्द्यांवरून घणाघाती टिका केली.

सरकारला कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नाही, सरकार वारंवार केंद्राकडे बोट दाखवत आहे. अशी टिका त्यांनी यावेळी केली.

माझे कुटुंब माझी जबाबदारी मग महाराष्ट्र कुटुंब असेल तर रुग्णांना सर्व उपचार करून देण्याची जबाबदारी नाही का? कुटुंबात सगळ्यांना कोरोना झाला तर मग मुख्यमंत्री राज्य कसं सांभाळणार? असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला. मातोश्रीच्या बाहेर कधी पडलेच नाहीत, तर कोरोना होईलच कसा असे देखील ते यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

भारताच्या नौकानयनपटूंनी रचला इतिहास

एबीपीच्या राजीव खांडेकरांना खोट्या बातमीसाठी नोटीस

केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांच्या ताफ्यावर हल्ला

कोरोना हाताळण्यात सरकार अयशस्वी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. त्याबरोबरच विविध मंत्र्यांनी खंडणीतून जमा केलेले पैसे लसीसाठी का नाही वापरत अशा शब्दात सरकारला जाब विचारला. बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, औषधे यांच्या अनुपलब्धतेबरोबरच वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या रिक्त असलेल्या जागांवरून देखील त्यांनी सरकारला लक्ष्य केले. एखाद्या मंत्र्याने आरोग्य सुविधा सुरू केली का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला.

केंद्राकडे बोट दाखवून अपयश झाकायचं काम सरकार करत आहे. जनतेचं शोषण करण्याचा एककलमी कार्यक्रम सरकारकडून चालवला जात आहे असेही ते म्हणाले. नुसतं हात धुवा आणि मास्क लावा हे एकच धोरण आहे, दुसरं काही नाही. सतत लॉकडाऊन करायला राज्य काय विकत घेतलं का असा सवाल देखील केला.

त्याबरोबरच सरकारच्या औद्योगिक धोरणावरून देखील त्यांनी टिका केली. सातत्याच्या लॉकडाऊन आणि निर्बंधांमुळे नुकसान होत असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. सरकार धंदा करू देत नाही असेही ते म्हणाले. महाराष्ट्राची प्रगती औद्योगिकीकरणामुळे झाल्याचे त्यांनी सांगितले. राज्याची आर्थिक घडी बसायला ५ वर्ष लागतील असेही ते म्हणाले.

ठाकरे सरकारच्या सातत्याने छत्रपतींचे नाव घेण्यावरून देखील त्यांनी सरकारला सुनावले. महाराजांचं नाव घेवू नका. आत्ता महाराज असते तर १०० कोटी गोळा करणारे जिवंत नसते. असेही ते म्हणाले. त्याबरोबरच सचिन वाझे, अनिल देशमुख, अनिल परब यांनी महाराष्ट्राची बदनामी केले असा आरोपही त्यांनी यावेळी सरकारवर केला.

Exit mobile version