बांग्लादेशातील हिंदूंवरील अत्याचारावर ‘या’ माजी अमेरिकन खासदाराने जगाला सुनावले

बांग्लादेशातील हिंदूंवरील अत्याचारावर ‘या’ माजी अमेरिकन खासदाराने जगाला सुनावले

पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्च महिन्याच्या अखेरीस बांगलादेश दौऱ्यावर जाऊन आले. बांग्लादेशमध्ये त्यांनी काली मातेच्या देवळात जाऊन दर्शनही घेतले. परंतु ही बाब न पचल्यामुळे बांगलादेशी इस्लामी कट्टरपंथीयांनी बांगलादेशी हिंदूंवर अत्याचार करायला सुरवात केली. अनेक हिंदूंची हत्या केली आणि मंदिरही फोडली. या संपूर्ण घटनाक्रमावर आणि बांगलादेशमधील हिंदूंच्या अवस्थेवर भाष्य करणारा एक व्हिडिओ अमेरिकेच्या माजी खासदार, तुलसी गब्बार्ड यांनी शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये गब्बार्ड स्वतः, कशा पद्धतीने बांग्लादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत यावर बोलल्या आहेत. बांगलादेशचा इतिहास हाच मुळात हिंदू द्वेषाचा राहिलेला आहे. ज्या मुस्लिम लीगने पाकिस्तानची मागणी केली, ती मुस्लिम लीग आजच्या पाकिस्तानात नाही तर आजच्या बांग्लादेशमध्ये सत्तेत आली होती. तत्कालीन बंगालमध्ये सत्तेत आल्यानंतर बंगालमध्ये मुसलमानांनी मोठ्या प्रमाणात हिंदूंची हत्त्या आणि बलात्कार सुरु केले. नोआखली या भागात सोऱ्हावर्दी या मुस्लिम नेत्याने हजारो हिंदूंची हत्या केली. डायरेक्ट ऍक्शनच्या नावाखाली कलकत्त्यातदेखील अनेक हिंदूंना मारले आणि हिंदू स्त्रियांवर बलात्कार केले.

याशिवाय १९७१ मधील बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यातदेखील, बांगलादेशमधील जमात-ए-इस्लामी आणि रझाकारांनी पाकिस्तानी सैन्याच्या मदतीने लाखो हिंदूंची हत्या केली. १९७०-७१ मध्ये पाकिस्तानी सैन्याकडून अत्याचार करण्यात आलेल्या बंगालींपैकी ८०-८५% हिंदू होते.

हे ही वाचा:

राहुल गांधी पाकिस्तानी ‘प्रॉपगॅन्डा’ चालवत आहेत का?

ठाण्यात पुन्हा दिसणार वाफेचे इंजिन

नरेंद्रने टिपले ‘नरेंद्राचे’ स्मारक

परमबीर सिंह यांच्या याचिकेवर निकाल ५ एप्रिल रोजी

यातच आता पुन्हा एकदा हिंदूंवरील अत्याचार आणि हत्यांना सुरवात झाली आहे आणि शेकडो वर्षांच्या मंदिरं तोडण्याच्या इस्लामी परंपरेलाही पुन्हा सुरवात झाली आहे. हिंदूंच्या या सुनियोजित कत्तलींमुळे, १९६१ साली बांग्लादेशमध्ये असलेले १८.५ टक्के हिंदूंचे प्रमाण हे २०११ मध्ये ८.५ टक्क्यांवर आले आहे.

Exit mobile version