‘या’ माजी आमदाराला अटक

‘या’ माजी आमदाराला अटक

जिल्ह्यातील पडळ येथील खटाव माण साखर कारखान्यातील अधिकाऱ्याला मारहाण झाली होती. त्या मारहाणीतनंतर त्यांचा मृत्यू होतो. केमिस्ट अधिकारी जगदीप थोरात यांच्या मृत्यूप्रकरणी विधानपरिषदेचे माजी आमदार प्राभकर घार्गे यांना वडुज पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी प्रभाकर घार्गे यांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना १५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. साखर कारखान्यातील साखरेची अफरातफर केल्याचा आरोपातून हा प्रकार घडला. या प्रकरणी प्रभाकर घार्गे यांच्यासह २० जणांवर ३०२ कलमांतर्गत गुन्हे दाखल झाले होते.

के.एम ऍग्रो प्रोसेसिंग लि.पडळ साखर कारखान्यातील केमिस्ट अधिकारी जगदीप थोरात यांचा मारहाणीत दोन महिन्यापुर्वी झाला होता मृत्यू झाला होता. या मारहाण या प्रकरणी वडुज पोलिसांनी २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत ८ संशयितांना वडुज पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी प्रभाकर घार्गे यांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना १५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

प्रभाकर घार्गे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेचे सातारा-सांगली स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाचे आमदार राहिलेले आहेत. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक देखील आहेत. खटाव माण साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत.

हे ही वाचा:

राज्याच्या अधिकारातील सवलती तातडीने मराठा समाजाला द्या

संभाजी ब्रिगेडकडून राष्ट्रवादीला घरचा आहेर

२-१८ वयोगटातील मुलांसाठी होणार लसीची चाचणी

दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कसा लावणार?

पडळ येथील के. एम. शुगर कारखान्यांमध्ये प्रोसेसिंग हेड म्हणून कार्यरत असणाऱ्या जगदीप थोरात या अधिकाऱ्याला १० मार्च २०२१ कारखान्यात साखरेची अफरातफर केल्याच्या आरोपावरून मारहाण करण्यात आली होती. यानंतर जगदीप थोरात यांना ११ मार्चला पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्रास होऊ लागला. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना कराड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.

Exit mobile version