‘ड्रग्ज माफियांची सुपारी घेणाऱ्यांचे थोबाड फोडणारा निर्णय’

‘ड्रग्ज माफियांची सुपारी घेणाऱ्यांचे थोबाड फोडणारा निर्णय’

शाहरुख खानचा मुलगा आर्यनने मुंबई ड्रग्ज प्रकरणी दाखल केलेला जामीन अर्ज महानगर दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळून लावला आहे. कोर्टाने हा अर्ज न्यायालयात तग धरणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

या प्रकरणावर नवाब मलिक यांनी टिप्पणी केल्यानंतर भाजपाकडूनही आता नवाब मलिक यांच्यावर हल्लाबोल केला जात आहे. आज जामीन अर्ज फेटाळल्यानंतर भाजपा आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी ट्विट करत नवाब मलिक यांच्यावर घणाघात केला आहे. “एनसीबीच्या विरोधात बेताल आरोप करणारे नवाब मलिक आता न्यायालयावर आरोप करणार आहेत काय? ड्रग्ज माफियांची सुपारी घेणाऱ्यांचे थोबाड फोडणारा हा निर्णय आहे.”

शाहरुख खानचा मुलगा आर्यन आणि इतर आरोपींनी कोविड-१९ चाचणी केली आहे. त्यांना वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे. त्यांना आता आर्थर रोड कारागृहात हलवले जाईल. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी न्यायालयाला विनंती केली होती की, आरोपीला मुंबईतील तपास एजन्सीच्या कार्यालयात ठेवावे कारण तुरुंगात कोरोनाव्हायरस चाचणी अहवालाशिवाय कैद्यांना प्रवेश मिळत नाही.

हे ही वाचा:

मोदी-किशिदा चर्चेनंतर भारत-जपान संबंधांत हा होणार बदल?

६८ वर्षांनी एअर इंडिया टाटांकडे

चीनची पुन्हा आगळीक; तवांग क्षेत्रात केली घुसखोरी

महिलांसाठी हा घेण्यात आला ‘बेस्ट’ निर्णय

आर्यनला कोविड प्रोटोकॉलनुसार पुढील ३-५ दिवस क्वारंटाईन सेलमध्ये आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात येईल. आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दंडाधिकारी न्यायालयाला सांगितले की, “तरुणांना त्यांचे स्वातंत्र्य परत मिळवण्याची संधी मिळायला हवी. तरुणाईत आजच्या कृतीचा उद्यावर काय परिणाम होईल याचा विचार करत नाहीत.” बॉलिवूड ड्रग प्रकरणासह अभिनेत्या रिया चक्रवर्तीचा समावेश असलेल्या इतर प्रकरणांमध्ये मानेशिंदेंनी वकिली केली होती.

Exit mobile version