“राजावाडी हॉस्पिटल, साकीनाका आणि पवई पोलीस स्टेशनला भेट दिली आणि अधिकाऱ्यांची भेट घेतली, बलात्काराच्या घटनेतील आरोपींविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईबाबत त्यांच्याशी चर्चा केली. बलात्काऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, सुरक्षिततेची भावना आमच्या बहिणींमध्ये कधीही कमकुवत होऊ नये त्यासाठी हे प्रकरण उदाहरण बनले पाहिजे. ही आमची मागणी आहे.” असं ट्विट करत मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांनी माहिती दिली.
राजावाड़ी हॉस्पिटल, साकीनाका एवं पवई पुलिस स्टेशन में जाकर अधिकारियों से भेंट की, बलात्कार घटना के आरोपियों पर चल रही कार्यवाही पर चर्चा की।
बलात्कारियों को कड़ी से कड़ी सजा मिले, हमारी माता-बहनों में सुरक्षा की भावना कभी कमजोर न हों, यह केस ऐसी मिसाल बने। यही हमारी मांग है। pic.twitter.com/tjNpgbsm2h
— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) September 11, 2021
“जेव्हा ‘हम करे सो कायदा’ या तत्त्वाने राज्यकारभार चालतो तेव्हा ‘कायद्याचे राज्य’ हे केवळ पोकळ शब्द होऊन राहतात. जर महाविकास आघाडीतील मंत्र्यांमध्ये महिलांविषयी जरा जरी सन्मान असेल तर त्वरित त्या सर्व पीडितांना न्याय मिळवून द्या आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळवून द्या.” असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.
“साकिनाकाच्या निर्भयाने आज प्राण सोडले. या प्रकरणातील सर्व आरोपींना तत्काळ अटक झाली पाहिजे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे आणि तसे तर न्यायालय शिक्षा देते. पण, या आरोपींना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे.” असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला.
हे ही वाचा:
आंतरराष्टीय दहशतवादी आज घेणार शपथ
मंत्रीच महिलांवर अत्याचार करत असतील तर मग गुन्हेगारांना थांबवणार कोण?
ठाकरे सरकारच्या आणखी एका मंत्र्यांचा घोटाळा
…आणि नीरजने आपल्या आईवडिलांना दिला पहिल्या विमानप्रवासाचा आनंद
साकीनाका बलात्कार प्रकरणी भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र सरकारला जबाबदार धरले आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांच्या घटना लक्षात घेता बलात्काराच्या संख्येत वाढ झालेली दिसून येत आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा चांगलाच बोजवारा उडालेला आहे. त्यामुळे राज्यातील सध्याच्या या स्थितीला केवळ राज्य सरकार जबाबदार आहे असे कोटक यांनी म्हटले आहे.