पीडितेच्या पालकांचा फोटो टाकून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न
अखेर ट्विटरने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं ते ट्विट हटवलं आहे. राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी या पीडितेच्या आई-वडिलांचा फोटो ट्विट केला होता. त्याला भाजपानेही आक्षेप घेतला होता. तर एका वकिलाने पीडितेच्या कुटुंबाची ओळख जगजाहीर होत असल्याने या फोटोला आक्षेप घेत दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर हे ट्विट हटवण्यात आलं आहे.
नांगल येथे एका मुलीवर बलात्कार झाला होता. या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांचा फोटो ट्विट केला होता. विनीत जिंदल या वकिलाने त्याला आक्षेप घेत दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती. राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून मुलीच्या आईवडिलांचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे पीडितेच्या कुटुंबीयांची ओळख पटली आहे. त्यामुळे या प्रकरणी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, असं जिंदल यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
राहुल यांनी केलेलं कृत्य हे पोक्सो कायद्यांतर्गत येतं. तसेच भादंविच्या कलम २२८ अच्या कलम २३ अंतर्गत हा गुन्हा आहे, असंही या तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरमी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने ट्विटर इंडियाला नोटीस देऊन हे ट्विट हटवण्यास सांगितलं होतं. तसेच या प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई करण्यासही सांगितलं होतं.
हे ही वाचा:
बारा वर्षांखालील मुलांना लस कधी मिळणार?
जम्मू- काश्मिरबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय!
कोविडची होणार हार, लसीकरण ५० कोटी पार
आदर पुनावाला म्हणून भेटले आरोग्यमंत्र्यांना…
राहुल यांनी बलात्कार आणि हत्येच्या घटनेवर दु:ख व्यक्त केलं होतं. देशाच्या या मुलीला न्याय हवा आहे, असंच या मुलीच्या आई-वडिलांचे अश्रू सांगत आहेत. न्यायाच्या मार्गावर आपण या मुलीच्या कुटुंबीयांसोबत आहोत, असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. दरम्यान, दिल्ली कँट परिसरातील ओल्ड नांगल स्मशानभूमीत या ९ वर्षीय मुलीचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला होता. जुन्या नांगल गावच्या पुजाऱ्याने सहमतीशिवायच या मुलीवर अंत्यसंस्कार केल्याचा आरोप या मुलीच्या कुटुंबीयांनी केलं आहे. त्यामुळे पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून पुजाऱ्यासह चार लोकांना अटक केली आहे.