भाजपाकडून जम्मू- काश्मीरसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

भाजपाकडून जम्मू- काश्मीरसाठी उमेदवरांची तिसरी यादी जाहीरतीन टप्प्यांत होणार निवडणूक

भाजपाकडून जम्मू- काश्मीरसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

जम्मू कश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. यासाठी भाजपकडून जोरदार तयारू सुरू असून त्यांनी उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्या सुरुवात केली आहे. भाजपाने आता तिसरी यादी प्रसिद्ध केली असून, यात दुसर्‍या टप्प्यातील निवडणूक होत असलेल्या मतदारसंघातील १० उमेदवार, तर १९ उमेदवार तिसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघातील आहेत.

जम्मू कश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ४४ उमेदवारांची यादी आधी सोमवारी प्रसिद्ध केली होती. पण, काही वेळातच ही यादी मागे घेण्यात आली. त्यानंतर भाजपाची वरिष्ठ पातळीवर दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर लगेचच पहिली यादी जाहीर करण्यात आली. त्यात १५ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या यादीत एका उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले होते. तर, आता तिसऱ्या यादीत २९ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. मंगळवार, २७ ऑगस्ट रोजी दुपारी भाजपकडून तिसरी यादी जाहीर करण्यात आली.

हे ही वाचा :

बांगलादेशातील सत्तापालटामुळे अदानींची मोठी रक्कम अडकली !

ममतांविरोधात डॉक्टरांचे ‘नबन्ना अभियान’, पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराचा वापर, पाण्याचा मारा !

महिला विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची धुरा हरमनकडे

मुंबईत दहीहंडीचा उत्सव शिगेला; १५ गोविंदा जखमी

जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुका १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबरला तीन टप्प्यांत होणार आहेत. तर, ४ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये ९० जागांसाठी निवडणुका होत आहेत. २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम ३७० हटवण्यात आले होते. त्यामुळे राज्याचा विशेष राज्य म्हणून असलेला दर्जा राहिलेला नाही. त्यानंतर पहिल्यांदाच निवडणुका होत आहेत. त्यामुळे या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात २४ विधानसभा जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर आहे. पहिल्या टप्प्यात जम्मू-काश्मीरमध्ये २४ जागांवर मतदान होणार आहे.

Exit mobile version