विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी कुणी पुढाकार घ्यायचा, या मुद्द्यापासून वाद सुरू होणार असेल तर २०२४ला मोदींचा पराभव करण्याच्या गोष्टी विसरा, हा विश्वास व्यक्त केला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कट्टर विरोधक असलेल्या निखिल वागळे यांनी.
शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तिसऱ्या आघाडीचा प्रयोग करण्यासाठी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी विरोधकांची एकजूट झाली खरी, पण त्यांचे नेतृत्व कोण करणार हेच स्पष्ट नसल्यामुळे आणि महत्त्वाचे पक्ष किंवा त्यांचे प्रमुख प्रतिनिधीच उपस्थित नसल्यामुळे पहिल्याच दिवशी या प्रयोगाचा बार फुसका निघाला. त्यानंतर निखिल वागळे यांना ही खात्री वाटू लागली की, अशा गोंधळलेल्या परिस्थितीत नरेंद्र मोदी यांचा पराभव करणे कठीण आहे.
हे ही वाचा:
धक्कादायक! उंदरांनी कुरतडले बेशुद्ध रुग्णाचे डोळे
२० दिवसांच्या विक्रमी वेळेत भारतीय रेल्वेने बांधला उड्डाणपूल
उद्धव ठाकरे नाना पटोलेंवर नाराज?
महाराष्ट्र भाजपाचा कार्यकारणी विस्तार! पुरोहित, निलंगेकर, पाठक यांच्याकडे मोठ्या जबाबदाऱ्या
पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकवटलेल्या या पक्षांतील बेबनाव पहिल्याच बैठकीला स्पष्ट झाला. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजीद मेमन यांनी बैठकीनंतर स्पष्ट केले की, ही बैठक शरद पवार यांनी बोलावली होती हे असत्य आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली, पण त्यांनी ही बैठक बोलावली नव्हती. भाजपाचे माजी नेते आणि सध्या तृणमूल काँग्रेसमध्ये असलेले यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्र मंचची ही बैठक होती.
या बैठकीला कम्युनिस्ट पार्टीचे सचिव डी. राजा व मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे सचिव सीताराम येचुरी उपस्थित राहणार होते, पण ते उपस्थित राहिले नाहीत. त्यांचे प्रतिनिधी बैठकीला होते. काँग्रेसला या बैठकीतून जाणीवपूर्वक बाहेर ठेवण्यात आले. डीएमके, राष्ट्रीय जनता दल, बसप यांचे तर प्रतिनिधीही या बैठकीला नव्हते.