24 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरक्राईमनामा'आप'च्या तिसऱ्या नेत्याला अटक झाल्यामुळे पक्षाला धक्का

‘आप’च्या तिसऱ्या नेत्याला अटक झाल्यामुळे पक्षाला धक्का

सिसोदिया, सत्येंद्र जैन यांच्यानंतर आता संजयसिंह

Google News Follow

Related

संजय सिंह हे केंद्रीय तपास यंत्रणांनी गेल्या १७ महिन्यांत अटक केलेले आपचे तिसरे नेते आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यात मनी लाँड्रिंगप्रकरणी दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना अटक करण्यात आली होती. तर, दिल्ली मद्यघोटाळ्याप्रकरणी ईडीने आपचे नेते मनीष सिसोदिया आणि संजय सिंह या दोघांना अटक केली आहे. सन २०२४मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

 

गेल्या वर्षी मे महिन्यात ईडीने दिल्लीचे तत्कालीन आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना पाच वर्षे जुन्या मनी लाँड्रिंगप्रकरणात अटक केली होती. चार कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सीबीआयने सन २०१७मध्ये भ्रष्टाचार प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या आधारेच ईडीने त्यांना अटक केली. आरोग्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत अधिक मालमत्ता मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

 

हे ही वाचा:

काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशला भारतापासून वेगळे दाखवण्यासाठी रेटला अजेंडा

पत्नीच्या छळामुळे कंटाळलेल्या क्रिकेटपटू शिखर धवनचा घटस्फोट मान्य

बेंगळुरूत वर्दळीच्या रस्त्यावरून बसस्टॉप चोरीला

हळद निर्यातीत १०० कोटी डॉलरचे लक्ष्य गाठण्यासाठी हळद मंडळाची स्थापना

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना मद्यघोटाळ्याप्रकरणी सीबीआयने फेब्रुवारीमध्ये अटक केली होती. त्यानंतर ते तिहार तुरुंगात असताना ९ मार्च रोजी त्यांना ईडीने याच प्रकरणात अटक केली. या घटनेला सात महिने उलटत नाही तोच आप नेते संजय सिंह यांना मद्यघोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सिंह यांच्या घरावर बुधवारी सकाळीच छापे पडले होते. त्यानंतर दिवसभर त्यांची चौकशी झाली आणि नंतर संध्याकाळी त्यांना अटक करण्यात आली.

 

 

सन २०२१-२२मध्ये दिल्ली सरकारने नवे मद्यधोरण आणले होते. मात्र काही जणांकडून लाच घेऊन त्यांना अनुकूल निर्णय घेतले गेल्याचा आरोप आपनेत्यांवर आहे. या मद्यघोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस दिल्लीच्या उपराज्यपालांनी केली होती. त्यानंतर तपासाअंती सिसोदिया आणि संजय सिंह यांना अटक करण्यात आली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा