धक्कादायक! भाजपासारखा व्यापक विचार करा, खुर्शीद यांचा काँग्रेसला सल्ला

धक्कादायक! भाजपासारखा व्यापक विचार करा, खुर्शीद यांचा काँग्रेसला सल्ला

यश मिळवायचे असेल तर भाजपाप्रमाणे व्यापक, भव्य विचार करावा लागेल, असे मत कुणा भाजप समर्थकाचे नाही तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांचे आहे. खुर्शीद यांच्या या मतामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.एका मुलाखतीत खुर्शीद म्हणतात की, आसाम आणि बंगालच्या निवडणुकीतून एकच गोष्ट घेण्यासारखी होती ती म्हणजे तुम्ही स्वतःला कमकुवत लेखता कामा नये. आपण मोठे यश मिळवूच शकत नाही, असा निराशावादी विचार करता कामा नये. भाजपाने त्यांचे अस्तित्वही ज्याठिकाणी नव्हते तिथे ते करून दाखविले. जिथे त्यांचे अस्तित्व नाही, तिथे त्यांचे प्रयत्न सुरू आहे. खुर्शीद हे मान्य करतात की, पश्चिम बंगालमध्ये मतदानात असे डावपेच रचण्यात आले की, काँग्रेस आणि डाव्यांचा सफाया झाला. याचा विचार काँग्रेसने भविष्यात करायला हवा.

हे ही वाचा:

परमबीर यांच्यावरील आरोपप्रकरणी घाडगेंना सीआयडीकडून समन्स

व्हेंटिलेटर्सवरून राजकारण कशाला करता; फडणवीसांचा सवाल

जम्मू- काश्मिरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

तौक्ते चक्रीवादळ: गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार

आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीत सर्वसामन्यांच्या मनातले काँग्रेसच्या जाहीरनाम्यात हवे, असेही खुर्शीद सांगतात.

नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही तर आसाममध्ये भाजपाने सत्ता मिळविली. केरळमध्ये तर राहुल गांधी खासदार असतानाही काँग्रसेची हार झाली. पुद्दुचेरीतही राष्ट्रीय लोकशाही आघाडीनेच बाजी मारली. पश्चिम बंगालमध्ये इंडियन सेक्युलर फ्रंट आणि आसाममध्ये एआययूडीएफ या पक्षांशी केलेल्या आघाडीमुळे पराभव झाल्यासंदर्भात खुर्शीद म्हणाले की, जेव्हा आपण अपयशी ठरतो तेव्हा अशाप्रकारची स्पष्टीकरणे दिली जातात. पण यश मिळाल्यावर वेगळी स्पष्टीकरणे असतात.

सध्या काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते पक्षाच्या धोरणावर टीका करत असून अशा २३ ज्येष्ठ नेत्यांनी बंडाची भाषा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर खुर्शीद यांचे हे वक्तव्य आता जोखले जात आहे.

Exit mobile version