“सांगलीची जागा ठाकरे गटाला देऊन चूक केली आहे”

नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आमदार विश्वजित कदम यांच्याकडून नाराजी व्यक्त

“सांगलीची जागा ठाकरे गटाला देऊन चूक केली आहे”

महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून अद्यापही नाराजी असून सांगली लोकसभेसाठी काँग्रेसकडून विशाल पाटील यांच्यासाठी प्रयत्न करूनही अपयश आल्यानंतर आमदार विश्वजित कदम यांनी सांगलीमध्ये पार पडलेल्या काँग्रेस मेळाव्यातून त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेस नेते नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.

विश्वजित कदम यांनी या मेळाव्यात बोलताना म्हटलं की, “गेल्या पाच वर्षांपासून अनेक आक्रमणे आमच्यावर झाली, पण काँग्रेस कार्यकर्त्यांमुळे आम्ही टिकून राहिलो. जिल्ह्यात २०० किलोमीटर जनसंवाद पदयात्रा काढली. काँगेसची जागा ही काँग्रेसला मिळाली पाहिजे हा आग्रह होता. आमच्यात गटबाजी होती, पण यावेळी आम्ही गटबाजीला पूर्णविराम दिला.” असं कदम म्हणाले.

विश्वजित कदम पुढे म्हणाले की, “सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहील असे सांगितले होते. आम्ही लोकांना सांगत गेलो की यंदा काँग्रेसचा खासदार असेल. जागावाटपाची चर्चा सुरू झाल्यानंतर सांगली आणि कोल्हापूरचा संबंध कुठे आला? शाहू महाराज ज्या पक्षाकडून लढतील त्यावर ते लढतील असे ठरले होते. मग सांगलीवर कसा काय हक्क सांगितला? उद्धव ठाकरे सांगलीत आले आणि चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. असं लोकशाहीत होतं का? जागा देऊन चूक केलीच, कोण काय करत होते, याकडे का लक्ष दिलं नाही?” असे अनेक संतप्त सवाल विश्वजित कदम यांनी उपस्थित केले.

हे ही वाचा:

खेळायला गेलेल्या दोन भावंडांचे मृतदेह धूळ खात पडलेल्या गाडीमध्ये सापडले

भारतीयाच्या हृदयाने वाचवले पाकिस्तानच्या युवतीचे प्राण

अरविंद केजरीवाल यांनी घोटाळ्यादरम्यान १७३ फोन नष्ट केले

अमेठी, रायबरेली भेटीपूर्वी गांधी भावंडे अयोध्येला थांबण्याची शक्यता

“सांगली जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी, अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी तळातील स्वातंत्र्यलढ्यामध्ये कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला मानून स्वातंत्र्यलढ्यामध्ये प्रचंड मोठं योगदान दिलं. सांगली जिल्ह्याची ही भूमी ही स्वातंत्र्यसैनिकांची लढावू भूमी आहे. क्रांतिसिंह नाना पाटील, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी असलेली देवराष्ट्र गाव हे मतदारसंघात आहे. स्वर्गीय वसंतदादा यांची जन्मभूमी कर्मभूमी आणि तदनंतर काँग्रेस पक्षाच्या विचारातून ज्यांनी सांगलीच्या मातीतून महाराष्ट्रामध्ये काम केलं ते पतंगराव कदम, स्वर्गीय आर. आर. पाटील, स्वर्गीय राजारामबापू असतील असे थोर हुतात्मे व्यक्ती आहेत ज्यांनी सांगलीच्या मातीतून जनतेचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये मोठे योगदान दिलं आहे,” असं विश्वजित कदम म्हणाले.

Exit mobile version