27 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरधर्म संस्कृतीराजपथावर संचलन पाहायला होते 'हे' खास पाहुणे

राजपथावर संचलन पाहायला होते ‘हे’ खास पाहुणे

Google News Follow

Related

भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त होणारे राजपथावरील संचलन हा कायमच एक आकर्षणाचा विषय असतो. दर वर्षी या कार्यक्रमासाठी काही विशेष परदेशी पाहुण्यांना प्रमुख अतिथी म्हणुन बोलावले जाते. पण यंदाच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनी भारतातील काही प्रमुख सामाजिक घटकांना या प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम बघण्यासाठी विशेष निमंत्रण पाठवले गेले आहे.

हे विशेष निमंत्रित असणार आहेत ऑटो रिक्षा चालक, सफाई कर्मचारी, बांधकाम कामगार आणि आरोग्य कर्मचारी. भारत सरकारतर्फे यांना प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे साक्षिदार होण्यासाठी खास पाचारण करण्यात आले. कोविड परिस्थिती लक्षात घेता या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मर्यादित लोकांनाच बोलवण्यात आले होते.

हे ही वाचा:

प्रजासत्ताक दिनाच्या गुगलकडून भारतीयांना खास शुभेच्छा

भारतीय महिला हॉकी संघाला उघडले वर्ल्डकपचे दरवाजे

‘किरीट सोमय्यांना कोणत्या अधिकाराने नोटीस पाठवली आहे?’

राज्यातील महाविद्यालये या तारखेपासून होणार सुरू

या कार्यक्रमाला २४,००० नागरिकांची मर्यादा होती. ज्यामध्ये १९,००० निमंत्रणे पाठवण्यात आली होती. तर बाकी सर्वसामान्य नागरिकांसाठी तिकीटे होती. या १९,००० निमंत्रणांपैकी ५६४ निमंत्रणे या विशेष घटकांना देण्यात आली होती.

यापैकी २५० निमंत्रणे बांधकाम कामगारांना देण्यात आली आहेत. तर ११५ सफाई कामगारांना निमंत्रित करण्यात आले होते. या सोबतच १०० रिक्षा चालकांना आणि १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना बोलावले गेले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कायमच समाजातील या घटकाच्या हिताचा विचार करताना दिसतात. आपल्या कृतीतून समाजातील सामाजिक दरी मिटवण्याचा ते प्रयत्न करत असतात. या आधीही काशी विश्वनाथ धामच्या बांधकामात योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत त्यांनी भोजन केले होते. तर त्या आधी त्यांनी सफाई कामगारांचे पायही धुतले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा