युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आज उत्तर प्रदेशाच्या शाहजहाँपुरमध्ये सभा पार पडली.शाहजहाँपुर मधून भाजपचे उमेदवार अरुण कुमार सागर यांच्या प्रचाराकरिता मुख्यमंत्री योगींनी सभेला संबोधित करताना काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली.ते म्हणाले की, अकबर आणि औरंगजेबाच्या या औलादींना सांगितले पाहिजे की हा नवा भारत आहे, राष्ट्रनायकांचा अपमान हा नवा भारत स्वीकार करणार नाही.
सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री योगी म्हणाले की, एकीकडे राष्ट्रनायकांचा सन्मान करणारी भारतीय जनता पार्टी आहे तर दुसरीकडे काँग्रेस, समाजवादी पार्टीची इंडी आघाडी त्याच्या विरुद्ध आहे. दोन दिवसांपूर्वी समाजवादी पार्टीने मैनपुरीमध्ये राष्ट्रनायक महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचा अपमान करण्याचा प्रयत्न केला.समाजवादी पार्टीचे गुंड मूर्तीवर चढतात आणि महाराणा प्रतापांच्या भाल्याची मोडतोड करण्याचा प्रयत्न करतात, शिवीगाळ करतात.ते पुढे म्हणाले, या अशा अकबर आणि औरंगजेबाच्या या औलादींना सांगितले पाहिजे की, हा नवा भारत आहे आणि या नव्या भारत राष्ट्रनायकांचा अपमान स्वीकार केला जात नाही.
हे ही वाचा:
सायबर फ्रॉड पुनीत कुमारच्या आईच्या लॉकरमध्ये सोन्याचं घबाड!
‘दीपस्तंभ’ला समाजसेवेच्या कार्याची पोचपावती मिळाली!
मंगेशकर कुटूंब भाऊ तोरसेकरांना ऐकते तेव्हा…
अकबर और औरंगजेब की इन औलादों को बताया जाना चाहिए…
यह 'नया भारत' है, राष्ट्रनायकों का अपमान स्वीकार नहीं करता है… pic.twitter.com/wrFEGeeLSJ
— Yogi Adityanath (मोदी का परिवार) (@myogiadityanath) May 6, 2024
निवडणुकीच्या काळात अशा गुंडांची गर्मी वाढते.पंरतु जस-जसे निवडणुकीचे निकाल समोर येतील तेव्हा या गुंडांची गुर्मी हळूहळू कमी होऊन जाईल, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.