“पाकिस्तानमधील दहशतवादी आणि त्यांचे हस्तक अलीकडेच दहशतवादी संघटनांचे सर्वोच्च कमांडर काढून टाकल्याने आणि शांततापूर्ण वातावरण राखल्याने निराश झाले आहेत. म्हणूनच दहशतवाद्यांनी भ्याडपणे अलीकडेच एक निशस्त्र पोलीस (उपनिरीक्षक), आणि एक निशस्त्र पोलीस आणि एक निष्पाप मजुराला आज कुलगाम जिल्ह्यात मारले,” असे जम्मू-काश्मीर पोलिस महानिरीक्षक विजय कुमार म्हणाले. “नुकत्याच झालेल्या सुरक्षा कारवायांमध्ये दहशतवाद्यांचे शीर्ष कमांडर मारल्यानंतर हे हल्ले दहशतवाद्यांची निराशा दर्शवतात.” असंही ते म्हणाले.
जम्मू -काश्मीर पोलिसांचा एक कॉन्स्टेबल आणि एक प्रवासी मजूर यांची दहशतवाद्यांनी आज कुलगाम जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये गोळ्या घालून हत्या केली. दहशतवाद्यांनी कॉन्स्टेबल बंटू शर्मा यांची वानपोह गावात त्यांच्या घराजवळ गोळ्या झाडून हत्या केली. अधिकाऱ्यांच्या मते, हल्ल्याच्या वेळी तो ड्युटीवर नव्हता. रविवारी श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी उपनिरीक्षक अर्शद अहमद मीर यांची गोळ्या घालून हत्या केल्याने या आठवड्यात पोलिसांची ही दुसरी हत्या आहे.
हे ही वाचा:
न्यूझीलंड पाठोपाठ इंग्लंडकडचाही पाकिस्तान दौरा रद्द?
अमेरिकेने मागितली ड्रोन हल्ल्याबाबत माफी
पश्चिम बंगाल पोलिसांना स्थानिकांशी गैरवर्तन महागात पडले
बीकेसी पूल दुर्घटनेवरील चर्चा थांबवण्यासाठी युतीची पुडी सोडली
बिहारमधील शंकर चौधरी, जो नेहामा गावात मजूर म्हणून काम करत होता, त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले जेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याआधी, उपनिरीक्षक मीरला जवळच्या ठिकाणाहून गोळ्या घालून ठार करण्यात आले होते जेव्हा त्याने ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला श्रीनगरमधील वैद्यकीय सुविधेत तपासणीसाठी नेले होते. कुपवाडा जिल्ह्यातील कलमुना गावात पोलीस अधिकाऱ्याच्या अंत्यसंस्काराला हजारो लोक उपस्थित होते.