तेलाच्या किमती वाढण्यामागे पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली ही दोन कारणं…

तेलाच्या किमती वाढण्यामागे पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली ही दोन कारणं…

ओपेक (पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्री ऑर्गनायझेशन) आणि ओपेक प्लस देशांना उत्पादनातील कपात न करण्याची विनंती भारताने केली आहे. अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रविवारी माध्यमांना दिली.

“इंधन दरवाढीमागे दोन मुख्य कारणे आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाचे उत्पादन कमी झाले आहे आणि उत्पादन करणारे देश अधिक नफा मिळवण्यासाठी कमी इंधन उत्पादन करत आहेत. यामुळे ग्राहक देशांना त्रास होत आहे.” असे धर्मेंद्र प्रधान म्हणाले.

एप्रिल २०२० मध्ये तेल उत्पादक देशांनी तेलाचे उत्पादन करी केले होते, कारण कोविड-१९ महामारीमुळे तेलाच्या मागणीमध्ये मोठी घट झाली होती. त्यामुळे तेल उत्पादक देशांच्या या निर्णयाचे भारताने स्वागत केले होते.

हे ही वाचा:

“लव्ह जिहाद हा केरळला इस्लामिक राज्य बनवण्याच्या षडयंत्राचा भाग”

गेल्या १० दिवसात तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. मुंबईत पेट्रोलचे दार हे ₹९७ प्रति लीटर तर डिझेलचे दार हे ₹८८ प्रति लीटर अशा विक्रमी अंकावर आहेत.

याच संदर्भात बोलत असताना धर्मेंद्र प्रधान यांनी तेलाच्या किमतीत होणाऱ्या वाढीमागे दोन प्रमुख कारणे असल्याचे सांगितले. आंतरराष्टीय तेलाच्या किमतीत वाढ होत आहे. कारण तेल उत्पादक देश हे जास्त नफा मिळवण्यासाठी तेलाचे उत्पादन कमी प्रमाणात करत आहेत.

Exit mobile version