योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात दिसणार हे ‘५२’ चेहरे

योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात दिसणार हे ‘५२’ चेहरे

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये सलग दुसऱ्यांदा सत्तारूढ होणाऱ्या भारतीय जनता पार्टी सरकारचा शपथविधी सोहळा शुक्रवार, २५ मार्च रोजी हा शपथविधी सोहळा पार पडत असून या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपाचे अनेक मंत्री आणि महत्वाचे नेते उपस्थित असणार आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह एकूण ५२ मंत्री आज शपथ घेत आहेत. यामध्ये २ उपमुख्यमंत्री, १६ कॅबिनेट मंत्री, १४ राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि २० राज्यमंत्री शपथ घेणारा आहेत.

हे ही वाचा:

नागराज मंजुळे आता डॉक्टर नागराज मंजुळे!

‘इक्बाल सिंग चहल यांच्या नातेवाईकांकडून सोनू निगमला धमकी’

बायज्यूजकडे फिफा फुटबॉल विश्वचषकाचे प्रायोजकत्व

पेनड्राईव्ह बॉम्बवरून राऊतांची आगपाखड 

असे असणार योगींचे मंत्रिमंडळ

उप मुख्यमंत्री – केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक

कैबिनेट मंत्री – सूर्य प्रताप शाही, सुरेश कुमार खन्ना, स्वतंत्र देव सिंह, बेबी रानी मौर्य, लक्ष्मी नारायण चौधरी, जयवीर सिंह, धर्मपाल सिंह, नंद गोपाल गुप्ता नंदी, भूपेंद्र सिंह चौधरी, अनिल राजभर, जितिन प्रसाद, राकेश सचान, अरविंद कुमार शर्मा, योगेंद्र उपाध्याय, आशीष पटेल, संजय निषाद

राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) – नितिन अग्रवाल, कपिलदेव अग्रवाल, रवीन्द्र जायसवाल, संदीप सिंह, गुलाब देवी, गिरीश चंद्र यादव, धर्मवीर प्रजापति, असीम अरुण, जेपीएस राठौर, दयाशंकर सिंह, नरेंद्र कश्यप, दिनेश प्रताप सिंह, अरुण कुमार सक्सेना, दयाशंकर मिश्र दयालु

राज्य मंत्री – मयंकेश्वर सिंह, दिनेश खटिक, संजीव गौड़, बलदेव सिंह ओलख, अजीत पाल, जसवंत सैनी, रामकेश निषाद, मनोहर लाल मन्नू कोरी, संजय गंगवार, बृजेश सिंह, केपी मलिक, सुरेश राही, सोमेंद्र तोमर, अनूप प्रधान, प्रतिभा शुक्ला, राकेश राठौर, रजनी तिवारी, सतीश शर्मा, दानिश आजाद अंसारी, विजय लक्ष्मी गौतम

Exit mobile version