मुंबईत पाणीपट्टी दरवाढ चालणार नाही

आमदार आशिष शेलार यांचा इशारा

मुंबईत पाणीपट्टी दरवाढ चालणार नाही

मुंबईत पाणीपट्टीवरून वाद निर्माण झाला आहे. पाणीपट्टी मुद्द्यावरून भाजपाने आपली भूमिका स्पष्ट केली असून पाणीपट्टीत वाढ करू नये अशी मागणी भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. पाणीपट्टीत ६ ते ७ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेने तयार केला आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेने १६ जूनपासून पाणीपट्टी दरामध्ये वाढ करण्याची तयारी सुरू केली आहे.

पाणीपट्टी दरवाढीला तीव्र विरोध असून एकाबाजूला मुंबईकरांना मालमत्ता करात सूट देऊन एका हाताने द्यायचे आणि दुसऱ्या बाजूला पाणीपट्टी वाढवून दुसऱ्या हाताने काढून घ्यायचे. हे चालणार नाही, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला आहे.

भाजपाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आयुक्तांना पत्र पाठवले आहे. पालिकेच्या जलविभागाने पाणी पट्टीवरची दरवाढ स्पष्ट केली आहे. मुंबईकरांना पुरेसे पाणी पोहोचत नाही. पाणी कसे पोहोचवू याचे नियोजन उद्धव ठाकरे यांनी केले नाही पण दरवाढीचा नियम मात्र करून ठेवला. पाऊस आणखी लांबला तर काय होईल अशी भीती मुंबईकरांना होती. अप्पर वैतरणामध्ये सरकारचा जो पाण्याचा साठा असतो तो देण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे त्याबद्दल सरकारचे आभार, असे आशिष शेलार यांनी म्हटले.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंचा गट म्हणजे चायनीज शिवसेना

१५ मिनिटांत एटीएम फोडून १९ लाख चोरून पसार

बिहारमध्ये बांधकाम सुरू असलेला पूल कोसळला

‘महाभारत’ मालिकेत शकुनी मामाची भूमिका साकारणारे गुफी पेंटल काळाच्या पडद्याआड

मुंबईकरांना पाणी पुरवठा करण्यासाठी राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा आणि भातसा तलावातून पाणी उपसण्यात येतं. यासाठी होत असलेला खर्च, कर्मचाऱ्यांच्या वाढीव आस्थापना खर्च, वीजबिलाची वाढ यामुळे पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. आता इक्बाल सिंह यांनी मंजुरी दिल्यास पाणीपट्टी वाढीची अंमलबजावणी येत्या काही दिवसात होईल. दरम्यान भाजपाने याला विरोध केला आहे.

Exit mobile version