तेव्हा कृषीमंत्री महाराष्ट्राचे होते
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज (२८ बुधवारी ) यवतमाळ येथील भारी येथे महिला बचत गटांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते.यावेळी या कार्यक्रमात बोलताना मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.पंतप्रधान मोदी म्हणाले की, “तुम्ही आठवा, इंडिया आघाडीचं जेव्हा केंद्रात सत्ता होती तेव्हा काय स्थिती होती? तेव्हा तर कृषीमंत्री सुद्धा याच महाराष्ट्राचे होते. त्यावेळी दिल्लीहून विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या नावावर पॅकेज घोषित व्हायचे. पण ते पॅकेज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याआधी मध्ये लुटले जात होते. गाव, गरीब शेतकरी, आदिवासीं याना काहीच मिळत नव्हते, असा आरोप पंतप्रधान मोदींनी यावेळी केला.
छत्रपती शिवाजी महाराजांना माझे नमन
पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज यवतमाळमध्ये हजारो कोटींच्या विकासकामाचं लोकार्पण करण्यात आले.यानंतर त्यांनी सभेला संबोधित केलं.आपल्या भाषणातून पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही नाव न घेता टीका केली.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जय भवानी, जय सेवालाल, जय बिरसा मुंडा असे अभिवादन करून भाषणाला मराठीत सुरुवात केली.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन भूमीला मी श्रद्धापूर्वक नमन करत त्यांनी भाषणाला सुरवात केली.
दिल्लीतून एक रुपया निघाला तर लाभार्थ्यापर्यंत १५ पैसे पोहोचत
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज बघा, मी एक बटन दाबलं आणि पाहतापाहता पीएम किसान सन्मान योजनेचे २१ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्य बँक खात्यात जमा झाले. आकडा लहान नाही. हीच तर मोदीची गॅरंटी आहे. काँग्रेसचे सरकार होते तेव्हा दिल्लीतून एक रुपया निघायचा आणि सर्वसामान्यांपर्यंत १५ पैसे पोहोचायचे.काँग्रेसचे सरकार असते तर आज आपल्याला जे २१ हजार कोटी रुपये मिळाले आहेत त्यापैकी १८ हजार कोटी रुपये मध्येच लुटले गेले असते.पण आता भाजपचे सरकार आहे, त्यामुळे गरिबांचा पूर्ण पैसे गरिबांना मिळत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
हे ही वाचा:
‘कलम ३७०’ने ५० कोटींचा टप्पा ओलांडला
आयसीसी क्रमवारीत जैस्वालची ‘यशस्वी’ मुसंडी
अकबर महान कसला?, तो तर बलात्कारी!
सिद्धू मूसवालाची आई ५८ व्या वर्षी गरोदर
काँग्रेसने आदिवासी समाजाला सर्वात मागे ठेवले
काँग्रेसच्या काळात आदिवासी समाजाला नेहमी सर्वात मागे ठेवण्यात आले.परंतु मोदीने मागास समाजांचा विचार केला.मागास समाजाच्या विकासासाठी २३ हजार कोटींची पीएम जनमत योजना सुरु झाली आहे.या योजनेतून महाराष्ट्राच्या कातरी, कोलाम आणि महाडिया सारख्या अनेर जनजातीय समुदायांना चांगलं जीवन देणार. गरीब, शेतकरी, जवान आणि नारीशक्तीला सशक्त करण्याचा हे अभियान आणखी वेगाने होणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
आज सव्वा करोड नागरिकांपर्यंत नळाचं कनेक्शन, हीच मोदीची गॅरंटी
गावात राहणाऱ्या आणि परिवारच्या नागरिकांना सर्व सुविधा मिळाव्यात हा आमचा गेल्या १० वर्षात निरंतर प्रयत्न राहिला आहे.दहा वर्षांपूर्वी हाहा:कार होता. देशातील गावांमध्ये १०० पैकी १५ कुटुंब असे होते जिथे पाईपने पाणी जात असे.गरीब, आदिवासी आणि दलितांना ही सुविधा मिळत नव्हती.ही परिस्थिती पाहता मोदीने लाल किल्ल्यावरुन हर घर जलची गॅरंटी दिली होती.आज जर पाहिलं तर १०० पैकी ७५ ग्रामीण कुटुंबांच्या घरी पाईपने पाणी पोहचले आहे.यापूर्वी महाराष्ट्रात ५० लाख पेक्षा कमी परिवारांपर्यंत नळाचं कनेक्शन होते.ते आज सव्वा करोड नागरिकांपर्यंत पोहचले आहे, असा दावा पंतप्रधान मोदींनी यावेळी केला.