मला तुरुंगात टाकण्याचे टार्गेट दिले होते, पण…फडणवीस काय म्हणाले?

मी ते यशस्वी होऊ दिले नाहीत

मला तुरुंगात टाकण्याचे टार्गेट दिले होते, पण…फडणवीस काय म्हणाले?

मला अटक करण्यासाठी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना तसं ‘टार्गेट’ देण्यात आले होते, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी आज एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात केला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना मला अटक करण्याचे “लक्ष्य” देण्यात आले होते, परंतु पोलीस अधिकाऱ्यानि मी काहीही चूक केली नसल्याने ते  यशस्वी होऊ शकले नाहीत.

एका प्रादेशिक वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. माविआ सरकारने मुंबई पोलीस आयुक्त पांडे यांना मला तुरुंगात टाकण्याचे टार्गेट दिले होते.माविआ सरकारने माझ्यावर केसेस टाकण्याच्या, फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या काही गुन्हेगारी आरोप माझ्यावर ठोकण्याचे आदेशच दिले होते, पण मी ते यशस्वी होऊ दिले नाहीत ,असे फडणवीस यांनी यावेळेस सांगितले.

पुढे फडणवीस असं म्हणाले की , महाराष्ट्रात जे सत्तांतर झालं त्यासाठी मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो. कारण उद्धव ठाकरे हे जर चुकीचं वागले नसते तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या व्यक्तींचा श्वास शिवसेनेत गुदमरला नसता. त्यामुळे हा एक वेगळा प्रयोग झाला त्या प्रयोगात मी मुख्यमंत्री होणार नाही हे मला पहिल्या दिवसापासून माहित होतं. मी उपमुख्यमंत्री होणार हे माझ्यासाठी सरप्राईज होतं. तो निर्णय मला त्या दिवशी देण्यात आला. मला घरी जा सांगितलं असतं तरीही मी गेलो असतो. पण मला उपमुख्यमंत्री व्हायला सांगितलं. त्यामुळे सुरूवातीला मी थोडे आढेवाढे घेतले पण पक्षाचा निर्णय मी अंतिम समजून मान्य केला असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

हे ही वाचा:

टाटा एआयजीच्या व्यासपीठावर कारुळकर प्रतिष्ठानचे सांकेतिक भाषा सत्र

कुस्ती अध्यक्ष बृजभूषण प्रकरणाच्या चौकशी समितीची अध्यक्ष मेरी कोम

ठाकरेंची शिवसेना पहिल्या क्रमांकापासून ‘वंचित’

‘जन गण मन’ : राष्ट्रगीत एक अभिमान गीत

मी सरकारच्या बाहेर राहूनच पक्ष मजबूत करायचं असं ठरवलं होतं. मात्र आमच्या नेत्यांनी मला उपमुख्यमंत्री व्हायला शेवटच्या क्षणी सांगितलं. मी पक्षाचा एक सच्चा सैनिक आहे. त्यावेळी निश्चित माझ्या मनात थोडं वाटून गेलंच. पण पक्षाने सांगितलेला आदेश मोठा आहे त्यापुढे काहीही नाही. मला त्यांनी घरी जायला सांगितलं असतं तरी मी घरी बसलो असतो. माझ्या पक्षामुळेच मी इथवर वाटचाल केली आहे. आमच्या नेत्यांनी मला सांगितलं की बाहेर राहून सरकार चालवता येत नाही. त्यामुळे पक्षाने जो निर्णय घेतला तो मी मान्य केला असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version