‘अमोलला बिनविरोध करण्याचा गजानन कीर्तिकरांचा कट होता’

भाजप आमदार प्रवीण दरेकरांचा आरोप

‘अमोलला बिनविरोध करण्याचा गजानन कीर्तिकरांचा कट होता’

शिवसेनेची उमेदवारी मिळाल्यानंतर ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेऊन अमोल कीर्तिकर यांना बिनविरोधी खासदार करण्याचा गजानन कीर्तिकर यांचा कट होता, असा भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी आरोप केला आहे.तसेच शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहून गजानन कीर्तिकर यांना पक्षातून काढण्याची विनंती केली आहे.

गजानन कीर्तिकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते आहेत.परंतु त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर हे ठाकरे गटात आहेत.अमोल कीर्तिकर हे मुंबई वायव्य लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार होते.या ठिकाणी २० मे रोजी मतदान पार पडलं.दरम्यान, भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी गजानन कीर्तिकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.शिवसेनेची उमेदवारी मिळाल्यानंतर ऐनवेळी अर्ज मागे घेऊन अमोल कीर्तिकर यांना बिनविरोध खासदार करण्याचा गजानन कीर्तिकर यांचा कट होता, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

हे ही वाचा:

बांगलादेशच्या खासदाराचा भारतात गूढ मृत्यू !

उपराष्ट्रपती धनखड इराणला रवाना, काय कारण?

विशाल अग्रवालसह तिघांना तीन दिवसीय पोलीस कोठडी!

अपघातानंतर पुणे महानगरपालिकेला आली जाग; अनधिकृत पबवर हातोडा!

प्रवीण दरेकर म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उमेदवारी मिळवायची. अमोल कीर्तिकर समोर गजानन कीर्तिकर उमेदवार राहतील. दुसरा कोणी उमेदवार नसेल आणि अर्ज मागे घेण्याच्या अंतिम क्षणी गजानन कीर्तिकर आपला उमेदवारी मागे घेणार. अशा पद्धतीने आपल्या मुलाला बिनविरोध खासदार म्हणून निवडून आणायचं, असा गजानन कीर्तिकर यांचा पूर्वनियोजित कट होता, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.

मुख्यमंत्री शिंदे यांनी गजानन कीर्तिकर यांच्या जेष्ठत्वाचा मान राखला, ते एक वरिष्ठ नेते असल्याने त्यांना वागणूक देण्यात आली.परंतु, गजानन कीर्तिकर यांचा उद्देश संशयास्थित होता आणि तो आता स्पष्टपणे बाहेर येताना दिसून येत आहे, असे प्रवीण दरेकर म्हणाले.

तसेच गजानन किर्तीकर यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी शिवसेनेचे उपनेते शिशिर शिंदे यांनी केली आहे.शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना तसे पत्र लिहिले आहे.मतदानाच्या दिवशी गजानन किर्तीकर आणि त्यांच्या पत्नीने पक्ष विरोधी वक्तव्य करून ठाकरे गटाची बाजू घेतली होती.’मातोश्री’चे लाचार ‘श्री’ होणाऱ्यांना पक्षातून त्वरित बाहेरचा रस्ता दाखवावा, अशी टीका करत गजानन किर्तीकर यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे.

Exit mobile version