मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत लसीकरणाचा मुद्दा चांगलाच गाजला. भाजपाने या विषयावरून सत्ताधारी शिवसेनेला लक्ष्य केलेले पाहायला मिळाले. लस खरेदीसाठी मुंबई महानगरपालिकेने जारी केलेल्या जागतिक निविदेची सद्यस्थिती काय ? या लसींचा पुरवठा किती दिवसात होणार ? किती संख्येने लस पुरवली जाईल? लसीचा दर व रक्कम काय असेल असे प्रश्न विचारत भारतीय जनता पार्टीतर्फे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समितीत माहितीचा मुद्दा (पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन) अंतर्गत उपस्थित केले.
महाराष्ट्रात कोरोना महामारीचा तांडव सुरु आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची चर्चा सर्वत्र सुरु आहे. पण या महामारीविरोधात लढण्यासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारचा सावळा गोंधळ सुरु आहे. राजधानी मुंबईतही हाच भोंगळ कारभार पाहायला मिळत आहे. ‘मुंबई मॉडेलच्या’ नावाखाली एकीकडे महापालिका स्वतःची पाठ थोपटून घेण्यात व्यस्त असली तरीही लसीकरणाच्या बाबतीत महापालिकेचा नियोजनशून्य कारभार दिसत आहे. यावरूनच मुंबई भाजपा आक्रमक झाली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत गटनेते प्रभाकर शिंदे यांनी सत्ताधारी शिवसेनेवर प्रश्नांचा भडीमार केला आहे.
हे ही वाचा:
‘तुझ्या बापाला’…किशोरी पेडणेकरांची जीभ घसरली
ट्विट डिलिट केले तरी महापौरांची असभ्य अक्षरं कोरली गेली आहेत
अनिल परबांच्या अडचणीत वाढ, दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
मुंबईकरांचे तातडीने लसीकरण झाल्यास कोरोनाची संभाव्य तिसरी लाट वेळीच रोखता येईल. यासाठी सर्व वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. आज रोजी लस उपलब्ध नसल्याने शहरातील ८० टक्के लसीकरण केंद्र बंद आहेत. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून अनेकांना लसीकरण केंद्रावरून लस न घेता माघारी जावे लागत आहे. त्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या अनेक वयस्कर नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. यातून मुंबईतील लसीकरण मोहिमेचे नियोजन बिघडल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. याबाबत पालिका प्रशासनाने तातडीने पावले उचलत समस्त मुंबईकरांसाठी लस उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करण्याची गरज असल्याचे मत प्रभाकर शिंदे यांनी व्यक्त केले.
या मुद्द्यावर अतिरिक्त आयुक्त वेलारासू यांनी उत्तर दिले. ग्लोबल टेंडरला ११ जणांनी प्रतिसाद दिला. त्यापैकी एकाने माघार घेतली आहे. १० निविदाकारांपैकी एकही लस उत्पादक कंपनीचा प्रस्ताव आलेला नाही. या सर्व निविदाकारांनी स्पुटनिक लस वितरणाचा दावा केला आहे. परंतु अद्याप एकही निविदाकार लस उत्पादकाबरोबर लस पुरवठ्याबाबत केलेल्या करारनाम्याची प्रत देऊ शकलेला नाही त्यामुळे लसीचा पुरवठा नेमका कसा होणार याची अद्याप स्पष्टता झालेली नाही. प्रशासन याबाबत दोन ते तीन दिवसात अंतिम निर्णय घेणार आहे अशी माहिती वेलारासू यांनी दिली.
तर ही वस्तुस्थिती लक्षात घेता अद्याप ग्लोबल टेंडरद्वारे लस उपलब्धतेबाबत अनिश्चितता कायम असून ही अतिशय गंभीर बाब आहे. लसीकरणापासून वंचित मुंबईकरांच्या दृष्टीनेही हे दुर्दैवी आहे असे प्रतिपादन भालचंद्र शिरसाट यांनी केले.