28 C
Mumbai
Thursday, December 12, 2024
घरराजकारण“विजयी मतांमध्ये एकही मुस्लीम मत नाही; मी हिंदुत्ववादी विचारसरणीच्या मतदारासंघाचा आमदार”

“विजयी मतांमध्ये एकही मुस्लीम मत नाही; मी हिंदुत्ववादी विचारसरणीच्या मतदारासंघाचा आमदार”

नवनिर्वाचित भाजपा आमदार नितेश राणे यांचा विश्वास

Google News Follow

Related

विधानभवनात विधानसभेचे विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले असून ७ डिसेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत नवनिर्वाचित आमदारांची शपथविधी पार पडणार असून यासाठी हे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. सत्ताधारी पक्षांचे आमदार हजर असून विरोधी पक्षांच्या आमदारांनी आज शपथ न घेण्याचा निर्णय घेतला आहे. ईव्हीएम विरोधात निषेध नोंदवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. अशातच कणकवलीचे नवनिर्वाचित भाजपा आमदार नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी नितेश राणे म्हणाले की, “माझ्या विजयाची हॅट्रिक झाली आहे. कणकवली- देवगडच्या जनतेने माझी हॅट्रिक घडवून आणली. माझ्या मतदार संघातील हिंदू समाजाने मला मोठ्या प्रमाणात मतदान केलं. हिंदुत्व आणि विकास या दोन प्रमुख मुद्द्यांवर मी निवडणूक लढवली,” असं नितेश राणे म्हणाले.

पुढे नितेश राणे म्हणाले की, “मी कणकवली- देवगडमधून ५८ हजार मताधिक्क्याने विजयी झालो. यात एकही मुस्लीम मत नाही आणि हे मी हक्काने सांगू शकतो. हिंदुत्ववादी विचारसरणीच्या मतदारासंघाचा आमदार म्हणून निवडून आलो. जनतेला माहित आहे टीका करणारे कावळे निवडणुकीपुरते असतात, आम्ही शिवरायांचे मावळे आहोत. ३६५ दिवस २४ तास जनतेच्या सेवेसाठी हजर आहोत,” असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या कळसाला मिळणार सुवर्ण झळाळी!

सीरियामध्ये गृहयुद्ध भडकलं; भारतीयांना प्रवास टाळण्याचा भारत सरकारचा सल्ला

मसूद अझहरच्या भाषणाच्या वृत्तानंतर भारताने पाकला ‘दुटप्पीपणा’वरून सुनावले

मालेगाव मनी लाँडरिंग प्रकरण: ईडीकडून १३.५ कोटी रुपये जप्त

भाजपा नेते आणि आमदार नितेश राणे हे सातत्याने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपली आक्रमक मते मांडत असतात. दरम्यान, विजयानंतरही त्यांनी हाच मुद्दा अधोरेखित केला आहे. मुंबईत विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरु झाले असून विधान भवनात नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीची प्रक्रिया पार पडत आहे. हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी निवडून आलेल्या आमदारांना शपथ दिली. नितेश राणे यांनी कणकवली विधानसभेतून विजयाची हॅट्रिक केली असून ते मोठ्या मताधिक्क्याने निवडणूक आले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
212,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा