“साकिनाकाच्या निर्भयाने आज प्राण सोडले. या प्रकरणातील सर्व आरोपींना तत्काळ अटक झाली पाहिजे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे आणि तसे तर न्यायालय शिक्षा देते. पण, या आरोपींना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे.” असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला.
“महिला आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती करायला सरकारला वेळ नाही. अशा घटना वारंवार होत असतील तर कायद्याचा धाकही राहत नाही आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होते. सरकार केवळ नियमबाह्य बदल्यांमध्ये व्यस्त आहे. राज्यात जे होते आहे, ते फारच दुर्दैवी आहे!” असंही फडणवीस म्हणाले.
LIVE | Media interaction in Mumbai https://t.co/uVDRZpR8r8
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 11, 2021
“शक्ती कायद्यावर नुसत्या बैठकांचे सत्र सुरू आहे. असे असले तरी विद्यमान कायद्यात सुद्धा कठोर तरतुदी आहेत. स्वत: मा. मुख्यमंत्र्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची भेट घ्यावी आणि जलदगती न्यायालयाची मागणी करावी.” असंही फडणवीस म्हणाले.
“मुंबईतील साकिनाका येथे घडलेली घटना सुन्न करणारी आहे. आज अमरावतीत बलात्कार, पुणे, पिंपरी येथील घटना या महाराष्ट्राच्या लौकिकाला धक्का लावणार्या आहेत, माणुसकीला काळीमा फासणार्या आहेत.” असं फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा:
साकीनाका बलात्कार पीडितेची झुंज अपयशी
‘केरळ मॉडेल’ पुन्हा पहिल्या क्रमांकावर
ममतांचा पुन्हा पराभव करायला भाजपाकडून ‘या’ महिलेला उमेदवारी
मोहन चौहान या नराधमाने महिलेवर बलात्कार झाला होता. बलात्कारानंतर प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने या महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर तिच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, तीन दिवस सुरू असलेली तिची मृत्यूची झुंज अखेर अपयशी ठरली. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर डीसीपी आणि एसपींनी तात्काळ राजावाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. राजावाडी पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.