मोदींच्या उत्तराधिकारी विषयावर काय म्हणाले फडणवीस ?

संजय राऊतांच्या विधानाला देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर

मोदींच्या उत्तराधिकारी विषयावर काय म्हणाले फडणवीस ?

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुढील वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल, असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट उत्तर देत या विषयाला पूर्णविराम दिले आहे. संजय राऊतांच्या विधानावर स्पष्ट प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वडील जिवंत असताना मुलांचा विचार करायचा नाही. नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी निवडण्याची वेळ अजून आलेली नाही.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याचे कोणतेही कारण नाही, नरेंद्र मोदी हे आमचे नेते आहेत आणि अजून बरीच वर्ष ते काम करणार आहेत. २०२९ चे पंतप्रधान म्हणून आम्ही नरेंद्र मोदी यांच्याकडेच पाहतो आहोत. पूर्ण देशही तेच बघत आहे आणि त्यामुळे आता अशी चर्चा करणं योग्य नाही. भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही, करायचाही नसतो. ही सगळी मुघल संस्कृती आहे. आता कोणाचाही, कुठेही उत्तराधिकारी निवडण्याची वेळ आलेली नाही, तसा प्रश्नही नाही. मााझा या विषयाशी संबंध नाही,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आमची भूमिका स्पष्ट असून कबर ही एएसआय प्रोटेक्टेड आहे. त्यामुळे औरंगजेब आवडो की ना आवडो, ५०-६० वर्षांपूर्वी कायद्याने प्रोटेक्शन मिळालं आहे. त्यामुळे कायद्याचं पालन करणं जबाबदारी आहे. पण औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होऊ देणार नाही हे मात्र निश्चित,” असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी गुढीपाडाव्यानिमित्त दिलेल्या भाषणातून महाराष्ट्रातील प्रदूषित नद्यांचा मुद्दा समोर आणला. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील नद्या निर्मळ झाल्या पाहिजे, असा प्रयत्न आहे. त्याकरिता काही मोहिमा हाती घेण्यात आल्या आहेत. ही तात्काळ स्वरूपात होणारी कामे नाहीत. थोडा वेळ खाणारा आणि खर्चिक कार्यक्रम आहे. मात्र हा केलाच गेला पाहिजे या मताचे आम्ही असल्यामुळे त्याची सुरुवात आम्ही केली आहे. यावेळी आपला कुंभमेळावा होईल. त्यावेळी पवित्र गोदावरी नदीत लोक स्नान करतील त्यावेळी त्यांना स्वच्छ पाण्याचा अनुभव कसा देता येईल हा आमचा प्रयत्न राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा..

दंतेवाडा-बिजापूर सीमेवर महिला नक्षलीवादीला यमसदनी धाडले

ज्ञानेन्द्र शाह यांनी गणराज्याविरोधात कट रचल्याचा आरोप

बॅनर्जी यांनी ईदच्या शुभेच्छा देताना विरोधकांवर निशाणा

धोनीचा बॅटिंगक्रम खाली येण्याने चेन्नई सुपर किंग्जला किती फायदा ?

तसेच राज्यामध्ये मराठी भाषा वापरली जाते की नाही हे पाहण्याचे काम राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिले आहेत. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मला वाटतं ज्या ठिकाणी मराठी वापरणं आवश्यक आहे, त्या ठिकाणी ती वापरली पाहिजे हा आग्रह असणं हे चुकीचं नाही. पण त्यासाठी कायदा हातात घेणं चुकीचं होईल. कोणी कायदा हातात घेणार नाही अशी अपेक्षा आहे,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

...म्हणून मोंदीचा नागपूर दौरा ऐतिहासिक! | Mahesh Vichare | Modi In Nagpur |

Exit mobile version