गेले दोन वर्ष सरकार अस्तित्वातच नाही

गेले दोन वर्ष सरकार अस्तित्वातच नाही

महाराष्ट्रात गेले दोन वर्ष सरकार अस्तित्वात आहे कुठे असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मंगळवार, २१ डिसेंबर रोजी पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे. बुधवार २२ डिसेंबर पासून सुरु होत असलेल्या महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी सरकारच्या चहापानावर विरोधी पक्ष बहिष्कार घालत असल्याचे सांगितले. तर ठाकरे सरकारच्या दोन वर्षांच्या कारभारावर फडणवीसांनी तोफ डागली आहे.

यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृती संदर्भात त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर गेले दोन वर्ष सरकारचे अस्तित्व कुठे होते असा सवाल फडणवीसांनी केला आहे. गेले दोन वर्ष महाराष्ट्राचे सरकारच अस्तित्वात नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. तर यावेळी त्यांनी अधिवेशनात विरोधी पक्ष नेमक्या कोणत्या विषयांना हात घालणार याबद्दल माहिती दिली आहे.

हे ही वाचा:

बड्या धेंडांकडून १३ लाख कोटी वसूल

ती म्हणते लाल किल्ला माझा, मला द्या!

लोकशाही बंद, ‘रोखशाही’ सुरु

परीक्षा घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपे निलंबित

विधानसभा अध्यक्षांची निवडणूक, ओबीसी आरक्षण, परीक्षांचे घोटाळे, विद्यापीठ कायद्यातील प्रस्तावित बदल, सरकारचा कारभार, अशा सर्वच विषयांवर फडणवीसांनी भाष्य केले. तर या सरकारच्या लेखी विदर्भ अस्तित्वातच नाहीये असे फडणवीस यांनी म्हटले. हे विदर्भाला अधिवेशन घेत नाहीत. विदर्भाला निधी देत नाहीत. या सरकारने वैधानिक विकास महामंडळाचा मुडदा पाडला आहे असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला आहे.

तर या अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका चर्चेची असणार आहे. अधिवेशनात गोंधळ होऊ नये, जास्तीत जास्त चर्चा व्हावी अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली.. तर सरकारने चर्चा होऊ दिली नाही. तर आम्ही इतर माध्यमे वापरून आवाज उठवू आणि आमचे म्हणणे मांडू असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.

Exit mobile version