24 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरक्राईमनामाभीमा कोरेगाव प्रकरणात संभाजी भिडेंविरोधात पुरावे नाहीत

भीमा कोरेगाव प्रकरणात संभाजी भिडेंविरोधात पुरावे नाहीत

Google News Follow

Related

शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे यांचे नाव भीमा कोरेगाव दंगलीच्या खटल्यातून वगळण्यात आले आहे. अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी राज्य मानवी हक्क आयोगाला दिली आहे. भीमा कोरेगाव दंगलीमध्ये संभाजी भिडे यांचा हात असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. या प्रकरणात एकूण २२ गुन्हे दाखल असून ४१ आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मात्र संभाजी भिडेंविरोधात भीमा कोरेगाव प्रकरणात कोणतेही ठोस पुरावे नसल्याने त्यांचे नाव वगळण्यात आले आहे.

१ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या भीमा कोरेगाव हिंसाचारात कथित भूमिकेसाठी पुणे पोलिसांनी भिडे आणि इतरांविरुद्ध आयपीसीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. भिडे यांच्याशिवाय आणखी एक हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे दलित कार्यकर्त्या अनिता सावळे यांच्या तक्रारीच्या आधारे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ठाण्यातील वकील आदित्य मिश्रा यांनी संभाजी भिडे यांच्याशी संबंधित प्रकरणाची सुनावणी होत नसल्याचे सांगत त्यातून यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार आयोगाकडे केली होती. त्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान संभाजी भिडे यांचा भीमा कोरेगाव प्रकरणात संबंध आढळून येत नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे नाव खटल्यातून वगळण्यात आले आहे.

हे ही वाचा:

बँडस्टँड येथील मोक्याचा शासकीय भूखंड कवडीमोल किंमतीने बिल्डरच्या घशात

साईंची आरती भोंग्यावर होऊ दे, मुस्लिम समाजाची प्रशासनाला विनंती

या विषयांवर पंतप्रधान मोदींनी नॉर्डिक देशांशी केली चर्चा

कान्स चित्रपट महोत्सवात भारताला ‘कंट्री ऑफ ऑनर’

मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी भिडे यांचा कोरेगाव भीमा दंगलीत सहभाग दाखवणारा कोणताही ठोस पुरावा पोलिसांना आढळला नाही. म्हणूनच त्यांचे नाव आरोपपत्रातून वगळण्यात आले आहे. दंगलीबाबतच्या आरोपपत्रात संभाजी भिडे वगळता इतर ४१ आरोपींची नावे आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा