नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून ईव्हीएम मशिन आणि व्हीव्हीपॅट मोजणीत तफावत असल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर निवडणूक आयोगाने सांगितले आहे की, यादृच्छिक केलेल्या मोजणीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सवर (ईव्हीएम) मिळालेल्या मतांमध्ये आणि व्होटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) मधील मतांमध्ये कोणताही फरक आढळून आलेला नाही.
राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रत्येक विधानसभा मतदारसंघ/ विधानसभा विभागातील पाच यादृच्छिकपणे निवडलेल्या मतदान केंद्रांच्या व्हीव्हीपॅट स्लिपची मोजणी करणे अनिवार्य आहे. त्यानुसार, प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच यादृच्छिकपणे निवडलेल्या मतदान केंद्रांची व्हीव्हीपॅट स्लिप मोजणी २३ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. त्यानुसार राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातील १,४४० व्हीव्हीपॅट युनिट्सची स्लिप गणना संबंधित कंट्रोल युनिट डेटासह केली गेली. संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार व्हीव्हीपॅट स्लिप काउंट आणि ईव्हीएम कंट्रोल युनिट गणनेमध्ये कोणतीही तफावत आढळलेली नाही. निवडणूक आयोगाने घालून दिलेली प्रक्रिया योग्य पद्धतीने पाळली गेली आहे,” असे एका निवेदनात म्हटले आहे.
हे ही वाचा :
आरोपी बस चालकाला संतप्त नागरिकापासून असे वाचवले पोलिसांनी
सीरियामधून ७५ भारतीयांचे यशस्वी स्थलांतर; लवकरच मायदेशी परतणार
ईव्हीएमवर दोन वेळा केंद्रात सत्ता भोगली, आता ओरडत आहेत!
महायुती आघाडीने प्रचंड विजय मिळवल्यानंतर, एमव्हीएने ईव्हीएमचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. मतमोजणीच्या संदर्भात निवडणूक आयोगाच्या विहित प्रक्रियेनुसार प्रत्येक मतदारसंघाच्या पाच मतदान केंद्रांसाठीची व्हीव्हीपॅट स्लीपची गणना अनिवार्य आहे. ती पूर्ण झाल्याशिवाय मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होत नाही. तसेच विजयी उमेदवार जाहीर करता येत नाही. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांमध्ये याबाबतच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले असल्याचे निवडणूक आयोगाने नमूद केले आहे.