27 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरराजकारणमहाविकास आघाडी विरोधात राष्ट्रवादीत मतप्रवाह

महाविकास आघाडी विरोधात राष्ट्रवादीत मतप्रवाह

Google News Follow

Related

महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्ष एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. पण असे असले तरी देखील आगामी काळात हे पक्ष एकत्र निवडणूक लढवताना दिसतात की नाही? याबद्दल कायमच चर्चा रंगलेली असते. यासंदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडी म्हणून निवडणुका एकत्र लढवण्याबाबत पक्षात दोन मतप्रवाह असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे राज्यात चर्चांना उधाण आले आहे.

मंगळवार, १० मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत त्यांना विचारण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात प्रश्न विचारला गेला असता पवारांनी याबाबत पक्षात एकमत नसल्याचे सांगितले. निवडणुका एकत्र लढाव्यात की नाही यावर अजून फारशी चर्चा झाली नसल्याचे पवार म्हणाले. पण पक्षात जेव्हा मी यासंदर्भात चर्चा केली. तेव्हा याबाबत पक्षात दोन मतप्रवाह असल्याचे समोर आल्याची कबुली शरद पवार यांनी दिली.

हे ही वाचा:

संतूरसूर हरपला!

राज ठाकरे माफी मांगो, उत्तर प्रदेशात शक्तीप्रदर्शन

रेल्वे स्थानकावर जीवंत स्फोटके सापडल्याने नागपूरमध्ये खळबळ

नाना पटोलेही करणार अयोध्या वारी

यापैकी एका गटाचे म्हणणे आहे की जर आपण सरकार महाविकास आघाडी म्हणून एकत्र चालवत असू तर निवडणूकसुद्धा एकत्र लढवली पाहिजे. ते सरकारसाठी ही चांगले ठरेल. पण एक मतप्रवाह असा आहे की सर्व घटक पक्षांनी निवडणुका आपापल्या चिन्हावर लढाव्या आणि निवडणूक झाल्यानंतर एकत्र यावे.

पण याबाबत अजून कोणताही अंतिम निर्णय झाला नसल्याचे पवार यांनी सांगितले. तर बाकीचे दोन पक्ष याबाबत काय भूमिका घेतात याबद्दल आपल्याला माहीत नसल्याचेही पवार म्हणाले. त्यामुळे यावर थेट वक्तव्य करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. इतर दोन पक्षांची मते जाणून घेऊनच यावर जाहीरपणे बोलेन अशी पळवाट शरद पवार यांनी धरली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा