महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढलेला आहे. राज्यात जागोजागी आरोग्य व्यवस्था अपुरी पडत आहे. त्यातच मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा संतापजनक प्रकार नांदेडच्या पिरबुऱ्हाणपुरमध्ये घडून येत होता. त्याचे वार्तांकन करायला गेलेल्या वार्ताहरांना मारहाण करण्यात आली. त्यावरून भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारला लक्ष्य केले आहे.
नेमके घडले काय?
नांदेडच्या पिरबुऱ्हाणपुर या ठिकाणी काही बोगस डॉक्टर कोरोनाच्या काळात धंदा करत होते. त्याचे वार्तांकन करायला एबीपी माझा या वाहिनीचे वार्ताहर गेले होते. त्यावेळी या वार्ताहरांना मारहाण तर करण्यात आलीच, परंतु त्यांचा कॅमेरा, मोबाईल आणि पैसेही हिसकवण्यात आले. त्यावरून अतुल भातखळकर यांनी सरकारवर टिका केली आहे.
नांदेडच्या पिरबुऱ्हाणमध्ये बोगस डॉक्टराच्या बातमीचं वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या एबीपी माझाच्या प्रतिनिधी आणि कॅमरामनला मारहाण, मोबाईल, कॅमेरा आणि पैसेही हिसकावले गेले. म्हणजे आता महाराष्ट्रात लोकशाहीचा चौथा खांब ही सुरक्षित नाही. राज्यात पुरती बेबंदशाही माजलेली आहे.
असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री कोरोनाची लाट थोपवण्याची उपाययोजना करण्याचे सोडून वसूलीत गर्क
शिवकथाकार डाॅ.सुमंत टेकाडे यांचे निधन
अमेरिकेतील गोळीबारात चार शिखांचा मृत्यू
चिनी दबावाविरुद्ध अमेरिका-जपानची वज्रमूठ
नांदेडच्या पिरबुऱ्हाणमध्ये बोगस डॉक्टराच्या बातमीचं वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या एबीपी माझाच्या प्रतिनिधी आणि कॅमरामनला मारहाण, मोबाईल, कॅमेरा आणि पैसेही हिसकावले गेले. म्हणजे आता महाराष्ट्रात लोकशाहीचा चौथा खांब ही सुरक्षित नाही. राज्यात पुरती बेबंदशाही माजलेली आहे. pic.twitter.com/fnIIMOE0Ey
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 17, 2021
यापूर्वी त्यांनी सरकार कोरोनाच्या लाटेसाठी तयार नसून केवळ वसूलीत मग्न आहे अशी टीका देखील केली होती. कोविड-१९च्या दुसऱ्या लाटेत सरकारच्या अपुऱ्या तयारीचे वाभाडे काढले गेले आहे.