28 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरराजकारण...तर आषाढी एकादशीला उद्धव ठाकरेंच्या हस्ते महापूजा होऊ देणार नाही

…तर आषाढी एकादशीला उद्धव ठाकरेंच्या हस्ते महापूजा होऊ देणार नाही

Google News Follow

Related

“मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलावण्याच्या तयारीत आहे. याच अधिवेशनात धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भातील कायदा तयार करावा,” अशी मागणी धनगर आरक्षण कृती समितीकडून करण्यात आली आहे. तसेच धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही तर आषाढी एकादशीच्या दिवशी पंढपूरमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा होऊ देणार नाही, असा इशाराही धनगर आरक्षण कृती समितीचे राज्य समन्वयक आदित्य फत्तेपूरकर यांनी दिला.

पंढरपूर येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वाड्यामध्ये धनगर आरक्षण कृती समितीची आज (१५ जून) बैठक घेण्यात आली. या बैठकीत परमेश्वर कोळेकर, आदित्य फत्तेपूरकर, पंकज देवकते, शालिवाहन कोळेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीनंतर आदित्य फत्तेपूरकर यांनी बैठकीतील चर्चेचा तपशील दिला.

“सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यामुळे राज्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे. याच कारणामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी १६ जूनपासून कोल्हापूर येथे मराठा समाजाकडून आंदोलन केले जाणार आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील कायदा करण्यासाठी राज्य सरकार दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्याच्या तयारीत आहे. त्याच अधिवेशनामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात कायदा पास करावा,” अशी मागणी धनगर आरक्षण कृती समितीकडून करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

राहुल द्रविड श्रीलंका दौर्‍यावर भारतीय संघाचा प्रशिक्षक असणार

… तर ओबीसी कल्याण मंत्रालय बरखास्त करा

अंबरनाथमध्ये २०० कोरोना मृत्यू लपवले?

आंदोलनात सहभागी झाल्यामुळे मयुरेश कोटकर यांच्यावर सूड उगवला जात नाही ना?

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकार विशेष अधिवेशन घेण्याच्या तयारीत आहे. यावेळी धनगर समाजाच्या आरक्षणाचाही प्रश्न मार्गी लावावा. तेव्हाच पंढरपूर येथील पांडुरंगाच्या शासकीय पूजेला यावे. जर धनगर आरक्षणावर निर्णय घेतला नाही, तर मुख्यमंत्र्यांना शासकीय पूजेला येऊ देणार नाही, असा इशारा धनगर आरक्षण कृती समितीकडून देण्यात आला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा