तर आम्ही चार पाकिस्तान बनवू- तृणमूल नेता

तर आम्ही चार पाकिस्तान बनवू- तृणमूल नेता

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. तृणमूल काँग्रेस पक्ष हा या निवडणुकांमध्ये मुस्लिम मतांवर अवलंबून राहणार आहे. तृणमूलचे नेते शेख आलम यांनी या विषयीचे वक्तव्यही दिले आहे. “आपण ३० टक्के आहोत ते ७० टक्के आहेत. ७० टक्क्यांच्या समर्थनाने ते सत्तेत येतील.” असे विधान शेख आलम यांनी केले. या बरोबरच, आम्ही चार पाकिस्तान तयार करू असंही ते म्हणाले.

पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आजवर मुस्लिम मतांवर अवलंबून राहून राजकारण केले. एका सर्वेनुसार २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला ६५-७० टक्के हिंदूंची मतं मिळाली होती. तर एवढ्याच प्रमाणात मुस्लिम मतं ही तृणमूल काँग्रेस पक्षाला मिळाली होती. यामुळेच तृणमूल पक्षाला ४२ पैकी २२ जागा मिळाल्या होत्या.

याशिवाय ममतांनी २०१५-१८ च्या काळात, अनेकवेळा मुस्लिम लांगूलचालन केल्याच्या घटना देखील भाजपाने पुढे आणल्या होत्या. यामध्ये रस्त्यावर नमाज पढण्यासाठी परवानगी देण्यापासून ते, कलकत्त्यातील दुर्गा पूजेचे पंडाल हटवण्याच्या निर्णयापर्यंतचे अनेक निर्णय आहेत.

हे ही वाचा:

सचिन वाझे विरोधात खंडणीची तक्रार

निर्लज्ज राहुल गांधी महिला- बुजुर्ग सन्मानाच्या बाता मारतायत

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा

सोनिया-सुप्रिया भेटीत काय घडलं?

“आपण ३० टक्के आहोत ते ७० टक्के आहेत. ७० टक्क्यांच्या समर्थनाने ते सत्तेत येतील. त्यांना लाज वाटली पाहिजे, जर आमची मुस्लिम लोकसंख्या एका बाजूला वळली, (एका पार्टीच्या दिशेने मतदान केलं) तर आम्ही चार पाकिस्तान बनवू. मग ७० टक्के कुठे जातील?” असे वक्तव्य शेख आलमने केले आहे.

Exit mobile version