“हे काबूलचे चित्र आणि तालिबानांचा कारनामा. संघ तालिबानी मानसिकतेचा असता तर गीतकार जावेद अख्तर यांना शबाना सोबत पानाची टपरी लावावी लागली असती. फरहानला घरोघरी सायकलने पानांची डिलिव्हरी करावी लागली असती.” असं म्हणत अतुल भातखळकर यांनी जावेद अख्तर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तालिबान्यांनी अनेक वाद्यांची तोडफोड केलेला एक फोटो जोडत अतुल भातखळकरांनी हे ट्विट केले आहे.
हे काबूलचे चित्र आणि तालिबानांचा कारनामा. संघ तालिबानी मानसिकतेचा असता तर गीतकार @Javedakhtarjadu यांना शबाना सोबत पानाची टपरी लावावी लागली असती. फरहानला घरोघरी सायकलने पानांची डिलिव्हरी करावी लागली असती. pic.twitter.com/N0eNHkHflo
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 7, 2021
जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली असून, त्याचे समर्थन करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे म्हटले आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी संभाषण करताना अख्तर म्हणाले की, आरएसएस, विहिंप आणि बजरंग दल सारख्या संघटनांचेही तालिबान सारखेच उद्दिष्ट आहे. ते म्हणाले की, भारतीय संविधान त्याच्या ध्येयाच्या मार्गात येत आहे, परंतु जर संधी मिळाली तर ते या सीमा देखील ओलांडतील.
हे ही वाचा:
जिओ धन धना धन! आणणार सगळ्यात स्वस्त स्मार्ट फोन
पंजशीरमध्ये पाडलं पाकिस्तानचं विमान
एका दिवसात एक कोटी लसीकरणाची भारताची हॅटट्रिक
भारतीय गोलंदाजीसमोर इंग्लंड ढेपाळला! भारताला २-१ आघाडी
जावेद अख्तर म्हणाले की, “ज्या पद्धतीने तालिबानी हे मुस्लिम राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्या पद्धतीने आपल्याकडे काहीजण हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडतात. हे लोकही त्याच मानसिकतेचे आहेत. तालिबानी हिंसंक आहेत, रानटी आहेत पण आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांचे समर्थन करणारे लोकही त्याच मानसिकतेचे आहेत.” अख्तर यांच्या या प्रतिक्रियेवरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा सर्व बाजूनी निषेध नोंदवला जात असून त्यांच्यावर चौफेर टीका होताना दिसत आहे.