“…तर मी येडियुरप्पा नाव सांगणार नाही”

“…तर मी येडियुरप्पा नाव सांगणार नाही”

“सिद्धरामैय्या तुम्ही कायम विरोधातच बसणार आहात याची मी ‘गॅरेंटी’ देतो. जर का मी पुढच्या विधानसभा निवडणुकांमध्ये १३०-१३५ जागा जिंकून सिद्धरामैय्यांना पुन्हा विरोधात बसायला भाग पाडलं नाही, तर मी येडियुरप्पा नाव सांगणार नाही.” असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस. येडियुरप्पा यांनी सांगितले.

येडियुरप्पा २०२१-२२ आर्थिक वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प मांडत असताना प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाने सभात्याग केला. यावर येडियुरप्पा चिडले आणि आजवर अर्थसंकल्प मांडत असताना कोणत्याही विरोधी पक्षाने सभात्याग केला नव्हता असा दावा त्यांनी केला.

हे ही वाचा:

भारतात उभा राहणार ओलाचा सर्वात मोठा इलेक्ट्रिक स्कुटर कारखाना

राज्यसरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे सांगत काँग्रेसने सभात्याग केला. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना येडियुरप्पा म्हणाले, “आजवर केंद्रात किंवा राज्यांमध्ये अशा पद्धतीने अर्थसंकल्प सादर करत असताना विरोधकांनी सभात्याग केल्याचा प्रसंग कोणाला ठाऊक आहे का? कोणत्या नैतिक अधिकाराबद्दल ते (काँग्रेस) बोलत आहेत? त्यांच्या नैतिक अधिकाराच्या प्रश्नावर मी सभागृहात जेंव्हा अर्थसंकल्पावर चर्चा होईल तेंव्हा उत्तर देईनच.”

“फुटकळ कारणं देऊन विरोधी पक्ष पळ काढत आहे. यावरून हे सिद्ध होतंय की सत्याला सामोरं जाण्याचं धाडस हे विरोधी पक्षांमध्ये नाही.” असंही येडियुरप्पा म्हणाले.

Exit mobile version