…तर हिंदू रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही

…तर हिंदू रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही

मालेगावमध्ये झालेली हिंसा हा एक प्रयोग होता. मालेगाव, अमरावती, नांदेडमध्ये हिंदूंची दुकानं जाळण्यात आली, दुकानदारांना मारहाण करण्यात आली. देशात अराजकता निर्माण करून आणि मुस्लिम मतांचं तुष्टीकरण करत ध्रुवीकरण करण्यासाठी केलेला हा प्रयोग होता. सरकार अशा घटनांना आशीर्वाद देणार असेल तर हिंदू रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. असा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केला आहे.

भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हा गंभीर आरोप केला. मालेगावची घटना साधी नव्हती. हा एक प्रयोग होता. देशात अराजक माजवण्यासाठी अल्पसंख्यकांचं ध्रुवीकरण करण्यासाठी विचार करून केलेला हा प्रयोग आहे. देशात ध्रुवीकरण करण्याचा हा प्रयोग आहे. हिंदूंची दुकाने निवडून निवडून जाळली जातात, एक तरी महाविकास आघाडीचा नेता त्यावर बोलला का? दुकान हिंदूचं असो की मुस्लिमांचं ते जाळणं चुकीचं आहे. पण एक तरी नेता बोलला का? असा सवाल फडणवीसांनी ठाकरे सरकारला आणि मंत्र्यांना केला.

आम्ही दंगल करणारे लोक नाही. भाजप कधी दंगल करत नाही. पण आमच्या अंगावर कोणी चालून आलं तर आम्ही शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. यापुढे आम्ही हिंदूंची दुकाने जळू देणार नाही. सरकार अशा घटनांना आशीर्वाद देणार असेल तर हिंदू रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारचा सोमैय्यांना अडवण्याचा प्रयत्न

आंध्र प्रदेशात भाजपा लवकरच मोठी शक्ती बनेल

काय आहे पूर्वांचल एक्सप्रेसवेचे महत्व?

राज्याला फडणवीसांसारख्या फुलटाईम मुख्यमंत्र्याची गरज

शुक्रवारी १२ नोव्हेंबर रोजी अमरावतीमध्ये बंदला हिंसक वळण लागून दगडफेक व तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. राज्य सरकारने या घटनांची दखल घेत अमरावती येथे कलम १४४ लागू केले असून अजूनही परिसरातील इंटरनेट सेवा बंद आहे. याच पार्श्वभूमीवर नागपुरातही कालपासून १४४ लागू करण्यात आले आहे.

Exit mobile version