…तर असे दिवसाला १०० गुन्हे दाखल करा, पण मी बोलत रहाणार

…तर असे दिवसाला १०० गुन्हे दाखल करा, पण मी बोलत रहाणार

भाजपाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनी गुन्हा दाखल केलाय. चित्रा वाघ यांनी बीडच्या शिरुरमध्ये येऊन माझी नको ती बदनामी केली, असा आरोप करत शेख यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावर आता चित्रा वाघ यांनीही मेहबूब शेख यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. महिल्यांवर अत्याचार करण्याऱ्यांबाबत भाष्य केलं म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल होत असेल तर असे दिवसाला १०० गुन्हे दाखल करा, असं आव्हानच चित्रा वाघ यांनी शेख यांना दिलं आहे.

“आज मी चिपळूणला आहे व मला बरेच जणांचे फोन येताहेत की शिरूरकासार येथे मेहबूब शेख च्या तक्रारीवर माझ्यावर गुन्हा दाखल केलाय. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर भाष्य केलं म्हणून राज्यात माझ्यावर गुन्हा दाखल होतं असेल तर असे दिवसाला १०० गुन्हे दाखल करा. पण मी बोलत रहाणार.. लडेंगे..जितेंगे”, असं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलंय.

१८ जुलै २०२१ रोजी शिवाजी एकनाथ पवार (जिल्हा परिषद सदस्य बीड) यांच्या घरी चित्रा वाघ आल्या होत्या. त्यांच्यासोबत बीड जिल्ह्याचे भाजपाचे अध्यक्ष राजेंद्र म्हस्के आणि इतर असंख्य कार्यकर्ते हजर होते. चित्रा वाघ यांनी शिरुर येथे येऊन माझी बदनामी व्हावी या उद्देशाने मी एका मुलीवर बलात्कार केला असल्याचं सांगत, राज्य सरकार मेहबूबला अटक करत नाही, असं म्हटलं.”

हे ही वाचा:

ईव्हीएम विरोधकांना न्यायालयाने काय चपराक लगावली?

अमित शहा-शरद पवार भेटीचे दरेकरांनी काय कारण सांगितले?

शरद पवारांनी का घेतली अमित शहांची भेट?

सरकार आता चिठ्ठी काढून निर्बंध-अनिर्बंधचा खेळ खेळतेय

औरंगाबादमधील एका तरुणीने राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणात मेहबूब शेख चांगलेच अडचणीत आले होते. त्यावेळी त्यांची पोलिस चौकशीही झाली. या सगळ्या प्रकरणांवरुन चित्रा वाघ यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. मेहबूब शेख यांना अटक व्हावी, अशी मागणी करणारे ट्विट त्यांनी मागील काळात केले.

Exit mobile version