विशेष अधिवेशनाचे काम दुसऱ्या दिवसापासून नव्या इमारतीत

१८ ते २२ सप्टेंबर अधिवेशन भरणार

विशेष अधिवेशनाचे काम दुसऱ्या दिवसापासून नव्या इमारतीत

केंद्र सरकारने गणपतीमध्ये संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या विशेष अधिवेशनाची १८ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. हे विशेष अधिवेशन पाच दिवस असणार आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या दिवशी म्हणजेच १८ सप्टेंबर रोजी संसदीय कामकाज सध्याच्या वास्तूत होणार आहे. तर, दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ सप्टेंबरपासून नव्या संसदेच्या इमारतीतून कामकाजाला सुरुवात होणार आहे. १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून हाच शुभ मुहूर्त पाहून संसदेच्या नव्या वास्तूत कामकाजाचा श्रीगणेशा होणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत संसदेचं विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्यापूर्वी दिल्लीत जी- २० शिखर परिषद होणार असून अनेक देशांचे प्रमुख भारतात येणार आहेत. सध्या दिल्लीत याची तयारी सुरू आहे. त्यानंतर काही दिवसांतच हे विशेष अधिवेशन होणार आहे. अधिवेशनात काय अजेंडा असेल याची अधिकृत माहिती देण्यात आली नसली तरी भारत विरुद्ध इंडिया, वन नेशन वन इलेक्शन आदी मुद्दे गाजण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

किशोरी पेडणेकर यांना अटक होणार? आर्थिक गुन्हे शाखेने ११ तारखेला बोलावले

राष्ट्रपतींच्या जी २० निमंत्रणाआधी ‘भारत’ नाव ब्रिक्सच्या अधिसूचनेतही

सनातन धर्माबद्दल टिप्पणी प्रकरणी उदयनिधी स्टॅलिन, प्रियांक खर्गेंविरोधात गुन्हा

सोमय्या प्रकरणी ‘लोकशाही’चे कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा

ऐन गणपतीत हे अधिवेशन बोलावल्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. विशेष अधिवेशात भाजपाच्या सर्व खासदारांनी आपली कामं रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अधिवेशन काळात केंद्र सरकारचे सर्व उच्चपदस्थ अधिकारी, सचिव, कॅबिनेट सचिव यांना दिल्ली न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे अधिवेशन काळात काय घडणार याकडे लक्ष असणार आहे.

Exit mobile version