विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा गुरुवार, २५ ऑगस्ट रोजी समारोप झाला. त्यानंतर पुढील हिवाळी अधिवेशनाची तारीख राज्यपालांकडे शिफारस करण्यात आली आहे. १७ ते २५ ऑगस्टदरम्यान झालेल्या अधिवेशनात शिंदे- फडणवीस सरकारने अनेक महत्त्वाच्या आणि मोठ्या घोषणा केल्या.
पावसाळी अधिवेशन हे पहिल्या दिवसापासूनच गाजले. विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिंदे-फडणवीस सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तर अधिवेशन संपण्याच्या एक दिवस आधी सत्ताधाऱ्यांनी घोषणाबाजी करताच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दिक चकमक आणि धक्काबुक्की पाहायला मिळाली.
दरम्यान, कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून हिवाळी अधिवेशन मुंबईत होत होते. मात्र, यंदाचे हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये घेण्यात येणार आहे. सोमवार, १९ डिसेंबर रोजी अधिवेशनाला सुरुवात व्हावी अशी शिफारस राज्यपालांकडे करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
प्रज्ञानंद प्रार्थना करून बुद्धिबळ खेळयला करतो सुरुवात
नौशेरामधून लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक
दिल्ली, उत्तरप्रदेशात हल्ल्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्याच्या पुण्यातून आवळल्या मुसक्या
पाकिस्तानात ब्राह्मोस पडल्याप्रकरणी तीन अधिकारी बडतर्फ
राज्य विधिमंडळाचे वर्षातून तीन अधिवेशन घेतले जातात. या तीन अधिवेशनापैकी दोन अधिवेशनाचे कामकाज मुंबईतील विधानसभा सभागृहातून चालते. तर, हिवाळी अधिवेशन दरवर्षी उपराजधानी नागपूर येथे घेतले जाते.