आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांची काल (३० जानेवारी) मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीचं अधिकृत निमंत्रण वंचित बहुजन आघाडीला देखील देण्यात आलं.वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर हे या बैठकीला उपस्तिथ होते.बैठक पार पडल्यानंतर महाविकास आघाडीकडून एक परिपत्र जारी करण्यात आले, ज्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेण्यात आल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं आहे.परंतु, वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झालेला नाही, असे वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे.
महाविकास आघाडीने अधिकृत पत्रक जारी करून वंचितला मविआत सहभागी करून घेतल्याचं काल जाहीर केले होते.या पत्रकावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वाक्षऱ्या होत्या.मात्र, महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश झाला नसल्याचे वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले.अकोला येथे प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद पार पडली तेव्हा ते बोलत होते.
हे ही वाचा:
ज्ञानवापी प्रकरणात हिंदूंचा मोठा विजय, मशिदीच्या तळघरातील व्यासजींच्या पूजेला मिळाली परवानगी!
राम मंदिराचे स्वप्न साकार,तिहेरी तलाक,गरिबांना कायम स्वरूपी घरे; राष्ट्रपती मुर्मू यांचे अभिभाषण!
क्रिकेटपटू मयांक अगरवाल विमानात असे काय प्यायला की, त्याला उलट्या सुरू झाल्या!
हर्ष गायकरच्या खेळाने दिलीप वेंगसरकर प्रभावित!
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, अद्याप वंचितचा महाविकास आघाडीत समावेश झालेला नाही. कारण वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून घ्यायचे असेल तर काँग्रेसच्या हायकमांडने मान्यता दिली पाहिजे आणि शी मान्यता दिली आहे की नाही, हे अद्याप आम्हाला माहिती नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आमच्याशी पत्रव्यवहार करतात.परंतु, महाविकास आघाडीत वंचितच्या समावेशाबाबतचा निर्णय काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात घेतील, असे आम्हाला समजले होते.आता सध्या ज्या पत्रकाबद्दल चर्चा सुरु आहे त्यावर फक्त नाना पटोले यांची सही असून बाळासाहेब थोरात आणि चव्हाण यांच्या सह्या नाहीयेत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.