योगींच्या आदेशावरून ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवले

योगींच्या आदेशावरून ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवले

सध्या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात मशिदीवरील भोंग्यांविरोधात राजकीय वातावरण तापले आहे. यासंदर्भातच उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगींनी मोठे पाऊल टाकले आहे. उत्तर प्रदेशमधील ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले आहेत. तर ३५ हजार धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी आवाजाची मर्यादा निश्चिक करुन देण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली असल्याची माहिती समोर आली आहे.

युपीमध्ये ३० एप्रिलपर्यंत भोंग्यांच्या आवाजासंदर्भात तातडीने कारवाई करण्यासंदर्भातील निर्देश जिल्हास्तरीय प्रशासनाला दिल्यानंतर राज्यात भोंग्याविरोधातील मोहीम सुरु करण्यात आली आहे. मागील आठवड्यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या विषयासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये योगी आदित्यनाथ यांनी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या धार्मिक मान्यतांचे पालन करण्याचा अधिकार आहे. मात्र त्याचा दुसऱ्यांना त्रास होणार नाही याचीही काळजी घेतली गेली पाहिजे, असे सांगितले होते. “भोंगे वापरण्याला हरकत नाही. मात्र भोंग्यांचा आवाज त्या धार्मिक स्थळांच्या आवातापुरता मर्यादित राहील याची काळजी घ्या. याचा इतर लोकांना काही तार्स होता कामा नये,” असं योगी बैठकीमध्ये म्हणाले होते.

हे ही वाचा:

“कुख्यात युसुफ लकडावाला प्रकरणी पवारांची चौकशी होणार काय?”

‘संजय राऊत लकडावाला यांच्या रिसॉर्टमध्ये राहायचे’

कराची विद्यापीठात स्फोट करणारी महिला दोन मुलांची आई

प्रशांत किशोर यांना अहमद पटेल व्हायचं होतं…

योगींच्या बैठकीनंतर राज्यभरामध्ये धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवणे तसेच त्यांच्या आवाजाची मर्यादा निश्चित करण्याची मोहीम सुरु झाली. या मोहिमेत चार दिवसात १० हजार ९२३ भोंगे हटवण्यात आले आहेत. तर ३५ हजार २२१ भोंग्यांच्या आवाजाला मर्यादा घालून देण्यात आली आहे.

Exit mobile version