ट्रिपल इंजिन सरकारमुळे राज्याचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

ट्रिपल इंजिन सरकारमुळे राज्याचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने होणार

राज्याला आता एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असतील त्यामुळे राज्याचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने धावेल. हे ट्रिपल इंजिन सरकार असेल, अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी नंतर दिली. विधानसभेचे सदस्य अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी रविवारी दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली.

“अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करतो. आता राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असतील. त्यामुळे राज्याचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने धावेल. हे ट्रिपल इंजिन सरकार असेल. अजित पवार यांनी विकासाला साथ दिली आहे,” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. अजित पवारांच्या अनुभवाचा सरकार आणि जनेतेला फायदाच होईल असही एकनाथ शिंदे म्हणाले.

हे ही वाचा:

शिवसेनेनंतर वर्षभरातचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट!

“मी अजित अनंतराव पवार, गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की…”

पुण्यात कोयत्याची दहशत; वाद झाला आणि तरुणाने थेट कॉलेजमध्येच कोयता नेला

वेस्ट इंडिज पहिल्यांदाच विश्वचषकासाठी अपात्र !

कोणी शपथ घेतली?

राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, दिलीप वळसे- पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी राज्यपाल रमेश बैस, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभेचे सदस्य, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.

Exit mobile version