देशपातळीवर भाजपाला टक्कर देण्यासाठी विरोधकांनी ‘इंडिया’ आघाडी उभी केली असून राज्य पातळीवर महाविकास आघाडी आहे. मात्र, महाविकास आघाडीने एकजूट होऊन लढण्याच्या आणाभाका घेतल्या तरी महाविकास आघाडीत बिघाडी आहे याचं चित्र हळूहळू स्पष्ट होताना दिसत आहे. सध्या लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीत एकमेकांवर कुरघोडी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
ठाकरे गटाने राज्यातील लोकसभेच्या २३ जागांवर दावा केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाने २३ जागा लढवल्या तर आम्ही किती जागा लढवायच्या? असा सवाल महाविकास आघाडीतून होत असतानाच काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ठाकरे गटाला आरसा दाखवला आहे.
“शिवसेना (ठाकरे गट) स्वबळावर लोकसभेची एकही सीट निवडून आणू शकत नाही. माझं चॅलेंज आहे. त्यांनी स्वबळावर एक तरी जागा निवडून आणून दाखवावी. ठाकरे गटाला काँग्रेसची गरज आहे आणि काँग्रेसलाही ठाकरे गटाची गरज आहे,” असं ठसठशीत विधान त्यांनी केलं आहे. ठाकरे गटाने गेल्या निवडणुकीत जेवढ्या जागा जिंकल्या होत्या त्यापैकी अर्धा डझन खासदार पळून गेले आहेत. आता त्यांच्याकडे चार किंवा पाचच खासदार उरले आहेत. तेही त्यांच्याकडे राहणार की नाही याची गॅरंटी नाही, असा खोचक दावा संजय निरुपम यांनी केला आहे.
हे ही वाचा:
‘फिर आयेगा मोदी’, भाजपकडून नवीन थीम गाणे रिलीज!
कॅनडामधील हिंदू मंदिराच्या अध्यक्षांच्या घरावर १४ गोळ्या झाडल्या
फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राने गुजरात, कर्नाटकला टाकले मागे!
अबूधाबीच्या हिंदू मंदिराचे मोदी करणार उद्घाटन
ठाकरे गटाकडे उमेदवार नाहीत. दिल्लीचे नेते येऊन निवडणूक लढणार आहेत का? असा सवाल त्यांनी केला. शिवाय संजय निरुपम कोण आहेत? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यालाही निरुपम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राऊतांपेक्षा अधिक चांगलं मला कोण ओळखतं? कदाचित राऊत यांची स्मरणशक्ती क्षीण झाली असावी, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.