भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे. शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माझ्या हत्येचा कट रचला आहे असा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला आहे. पोलीस स्टेशनच्या बाहेर माध्यमांशी बोलताना त्यांनी आरोप केला. पोलिसांनी मला लिखित मध्ये दिले आहे की घातपात होण्याची शक्यता आहे. तुमच्या जीवाला शिवसेना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून धोका आहे.
किरीट सोमय्या सकाळपासून दापोलीच्या दिशेने निघाली आहे. त्याच्या सोबत भाजपा नेते निलेश राणे हे देखील आहेत. दापोलीत दाखल होताच सोमय्या यांच्या कार्यकर्त्यांचा ताफा अडवण्यात आला. निलेश राणे आणि त्यांच्या सोबत चार-पाच जणांना दापोली पोलिस स्थानकात बोलवण्यात आले. पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले नाही. त्यांना पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले त्यांना का बोलावले? का बसवले? याची कोणतीच माहिती देण्यात आली नाही. तुमच्या जीवाला धोका आहे असे सांगून त्यांना थांबवण्यात आले. पण नंतर त्यांना सोडण्यात आले. पण कार्यकर्त्यांचा ताफा मात्र अडवून ठेवण्यात आला. यावरूनच यात काहीतरी कट-कारस्थान असल्याचा आरोप केला जात आहे.
जिल्ह्याचा एसपी कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचा आरोप भाजपा महाराष्ट्र सचिव निलेश राणे यांनी केला आहे. ठाकरे सरकारचा एसपी यांच्यावर दबाव आहे. सधा एफआयआर दाखल करून घेत नाही. साधे भेटायला आले नाहीत. पण सतत कोणाशी तरी फोनवर बोलत आहेत. फोनवरून कोणीतरी त्यांना सूचना करत आहे यादी नारायण राणे यांना अटक करण्यात आली तेव्हा देखील अनिल परब यांच्या सूचनेनुसार कारवाई करत असल्याचे माध्यमांनी दाखवले. तसेच आता एसपी यांच्यावर कोणाचा तरी दबाव आहे.
हे ही वाचा:
पुढील वर्षीपासून महिला आयपीएल स्पर्धेचा थरार रंगणार
‘राजकारण गेलं चुलीत, फक्त महाराष्ट्र ठीक राहिला पाहिजे’
मध्य रेल्वेला कमाईत मिळाले अव्वल स्थान!
हिजाब वादाचे पडसाद विरारमध्ये?
दरम्यान भाजपा नेते किरीट सोमय्या हे दापोली पोलीस स्थानकाच्या बाहेरच ठिय्या आंदोलनाला बसले आहेत. आमच्या सर्व कार्यकर्त्यांना जोपर्यंत सोडत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशी भूमिका सोमय्या यांनी घेतली आहे.