राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी हे शनिवार, ५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी कसबा बावडा येथील भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी भाषण करताना राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधान याबद्दल मोठं विधान केले आहे.
राहुल गांधी म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांची ही फक्त एक मूर्ती नाही आहे. मूर्ती तेव्हा तयार केली जाते, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या विचारधारेला, त्यांच्या कर्माना मनापासून स्वीकारतो. शिवाजी महाराज ज्या गोष्टींसाठी आयुष्यभर लढले, त्या गोष्टीसाठी आपण लढलो नाही तर पुतळा अनावरणाला काही अर्थ नाही. जेव्हा आपण या मूर्तीचे अनावरण करतो, तेव्हा आपण हे वचन देखील घेतो की ज्या पद्धतीने ते जगले, त्यांच्या इतके नाही पण थोडेफार तर आपण देखील काम केले पाहिजे,” असं राहुल गांधी म्हणाले.
हे ही वाचा:
जम्मू- काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा
जैश-ए-मोहम्मदच्या कारवायांशी संबंधित एनआयएकडून पाच राज्यांत छापेमारी
पवारांनी लावली ७५ टक्के आरक्षणाची काडी
अमितभाई कल किसने देखा आताच निर्णय घ्या…
“छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाला आणि जगाला मोठा संदेश दिला आहे. देश सर्वांचा आहे. सर्वांना घेऊन चालायचं आहे. अन्याय करायचा नाही. असं शिवाजी महाराज म्हणायचे. त्यांच्या विचाराचं आज कोणतं चिन्ह असेल तर ते संविधान आहे. महाराजांच्या विचारांचे आणि संविधांचे थेट कनेक्शन आहे. जे शिवाजी महाराजांनी सांगितले, त्याचे २१ व्या शतकातील भाषांतर हे संविधान आहे. शिवाजी महाराज ज्या गोष्टींसाठी लढले ते सर्व या संविधानात आहे. त्यांचे विचारचं या संविधानात आले आहेत. शिवाजी महाराज आणि शाहू महाराज नसते तर संविधान नसतं,” असं वक्तव्य राहुल गांधी यांनी त्यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी केले आहे.