रश्मी बर्वेंना दणका; जात पडताळणीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

रश्मी बर्वेंना दणका; जात पडताळणीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

महाविकास आघाडीच्या उमेदवार रश्मी बर्वे यांना जात पडताळणी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. अपात्र ठरलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार रश्मी बर्वे यांची उमेदवारी फेटाळली आहे. रश्मी बर्वे यांचा लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली होती. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देत रश्मी बर्वे यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष परवानगी याचिका दाखल केली. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. काँग्रेसने त्यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर जात पडताळणीचं प्रकरण समोर आलेलं होतं.

काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणीला पार पडली. खोटे कागदपत्र लावल्यामुळे काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द ठरवले होते. जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडून प्रमाणपत्र रद्द झाल्याने रश्मी बर्वे यांचा लोकसभा निवडणूकीची उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला होता. रश्मी बर्वे महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या. त्यांच्या जात पडताळणीचा मुद्दा उपस्थित झाला होता. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली होती. या सुनावणी वेळी न्यायालयाने सरकारवरही ताशेरे ओढले. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत याचिका फेटाळून लावली आहे.

हे ही वाचा:

छत्तीसगढमध्ये बस दरीत कोसळली, १२ मजुरांचा मृत्यू!

राम मंदिरात दिसणार अनोखे सोन्याचे रामायण!

बागेश्वर बाबा यांना जीवे मारण्याची धमकी

भारताने डोळे वटारल्यावर कॅनडाचे ट्रुडो वरमले

खोटे कागदपत्र लावल्यामुळे काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द ठरवले होते. जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडून प्रमाणपत्र रद्द झाल्याने रश्मी बर्वे यांचा लोकसभा निवडणूकीची उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला होता.

Exit mobile version