गोरेगाव मध्ये राज ठाकरेंच्या कार्यक्रमात स्टेज कोसळले

गोरेगाव मध्ये राज ठाकरेंच्या कार्यक्रमात स्टेज कोसळले

आज शिवजयंतीचे निम्मित साधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या शाखा उद्धघाटनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. सकाळपासून त्यांनी दोन शाखांचे उदघाटन केले आहे. त्या दरम्यान गोरेगावमध्ये शाखा उदघाटनाला मनसे कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती, तेव्हा राज ठाकरे भाषण देत असताना अचानक स्टेज कोसळले. त्यामुळे कार्यकर्त्यांचा गोंधळ उडाला आणि धक्काबुक्की झाली.

कार्यक्रमादरम्यान अचानक स्टेज कोसळल्यामुळे कार्यकर्त्यांनी आणि लोकांनी स्टेज समोर गर्दी करायला सुरवात केली त्यामुळे पत्रकारांना धक्काबुकीचा त्रास सहन करावा लागला. दरम्यान स्टेज कोसळल्यामुळे कोणतीही हानी झालेली नाही अशी माहिती समोर येत आहे. राज ठाकरे आणि कार्यकर्ते तसेच इतर लोक सुरक्षित असून राज ठाकरे आता पुढील कार्यक्रमाला रावण झाले आहेत.

शिवजयंतीच्या निमित्ताने राज ठाकरेंनी सकाळपासून दोन मनसे शाखांचे उदघाटन केले आहे. सकाळी त्यांनी साकीनाकामध्ये एका शाखेचे उदघाटन केले आणि पुढे गोरेगाव मध्ये एका शाखेचे उदघाटनावेळी असा प्रकार घडला.
दरम्यान, त्यांनी सर्वांना शिवजयंतच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हे ही वाचा:

शिवनेरीवर बाळ शिवबासाठी पाळणा जोजवला

‘छत्रपती शिवाजी महाराजांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत’

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम…..

रजनीश सेठ यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

तसेच, यावेळी त्यांनी शाखेचे उद्घाटन केल्यानंतर मनसे सैनिकांना काही सूचनाही केल्या आहेत. शाखा ह्या जनतेच्या कल्याणासाठी उघडल्या असून, या शाखेत आल्यानंतर लोकांना न्याय मिळाला पाहिजे असा लोकांना विश्वास वाटला पाहिजे. असे त्यांनी कार्यकर्त्यांना खडसावून सांगितले आहे. शिवाजी महाराजांची जयंती तिथीनेच साजरी झाली पाहिजे, असेही राज ठाकरे यांनी सांगितले आहे. यावेळी जय शिवाजी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असोचा जयघोषही केला. या कार्यक्रमाला मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version