काँग्रेसचा गरिबी हटवचा नारा फक्त निवडणुकी पुरताच असून तळागाळातील लोकांना गाळात घालण्याचे काम काँग्रेसने केल्याचे सांगत भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.कोरेगाव येथे भाजपा स्थापना दिनानिमित्त पार पडलेल्या कार्यक्रमात उदयनराजे बोलत होते.
उदयनराजे म्हणाले की, काँग्रेस काळात गरीबी हटावच्या घोषणा असायच्या.अत्यंत तळमळीने तळागाळातील लोकांना बोलले जायचे. पण निवडणुकीचा एकदाचा निकाल लागला तर पुढच्या निवडणुकीपर्यंत त्याच तळागाळातील लोकांना त्याच परिस्थितीत राहावे लागले.किंबहुना तळागाळातील लोकांना हात देऊन तरी वर खेचण्यापेक्षा त्याच लोकांना जास्तीत जास्त गाळात घालण्याचे काम पाहायला मिळाले, असे उदयनराजे भोसले म्हणाले.
हे ही वाचा:
केरळ: निधीची मागणी करत ‘बादल्या’ घेऊन रस्त्यावर उतरली ‘काँग्रेस’!
काँग्रेसचा जाहीरनामा पाक निवडणुकीसाठी अधिक अनुकूल!
जोस बटलरच्या १०० धावा विराटच्या ११३ धावांपेक्षा सरस!
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमाचे मराठी कलाकारांकडून कौतुक!
ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणे पाहिली तर दुर्लक्षित, दुर्गम, वंचित, शेतकरी, गरजू, महिला, सर्वांसाठी अनेक योजना राबवल्या गेल्या. एक नियोजन बद्ध कार्यक्रम मोदींच्या नेतृत्वाखाली आखण्यात आला,” असे उदयनराजे भोसले म्हणाले.
दरम्यान, साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांनाच उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे.मागील लोकसभेला उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला होता.राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील हे त्यावेळी निवडून आले होते.आता वेळी देखील साताऱ्यातील निवडणूक पाहणे रंजक ठरणार आहे.मात्र महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गटाकडून अद्याप याबाबत निर्णय झाला नाही. त्यामुळे उदयनराजे भोसले यांच्याविरोधात कोण लढणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.