शेतकरी शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अब्दुल सत्तार आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांसोबत बैठक आज यशस्वी झाली असून शेतकऱ्यांच्या सगळ्या १४ मागण्या पण मान्य झाल्या आहेत. आज दोन ते तीन तास हि बैठक झाली तर उद्या हा शेतकरी मोर्चा मागे घेतला जाणार आहे. म्हणून हे लाल वादळ उद्या शुक्रवारी माघार फिरणार असल्याचे म्हंटले आहे. यामधील काही मागण्या या विचाराधीन असून जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मोर्चा सुरु राहणार असल्याचे इंद्रजित गावित यांनी मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीनंतर म्हंटले आहे. शेतकऱ्यांचा जो मोर्चा विधानभवनाच्या दिशेला निघाला होता तो मोर्चा आता वाशिममध्ये काही दिवसापुरता मुक्काम ठोकणार आहे.
थोड्याच वेळात आंदोलकांच्या मागण्यांसंदर्भातील निवेदन पटलावर ठेवणार असल्याची माहिती आमदार विनोद निकोल यांनी दिली आहे. पण वाशीम इथे थांबून मागण्यांच्या अमलबजावणीसाठी वाट पाहणार असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय अंमलबजावणी होत नसल्यास पुन्हा मोर्चा मुंबईच्या दिशेला यायला निघेल असा इशारा त्यांनी दिला आहे. अधिवेशन होईपर्यंत आम्ही सरकारला मुदत दिल्याचे इंद्रजित गावित यांनी म्हंटले आहे. किसान सभेच्या शिष्टमंडळाची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली आमच्या मागण्यांवर आज बरीच चर्चा झाली मागच्या दोन मोर्चाचे अनुभव लक्षात घेऊन आश्वासने दिली जात होती पण त्यावर प्रशासनाकडून अंमलबजावणी केली जात नव्हती.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरेंच्या मशालीतला आणखी एक निखारा निघाला…दीपक सावंत एकनाथ शिंदेंकडे
‘राम- सीता’ ३५ वर्षानंतर पुन्हा आले एकत्र…
राहुल गांधी आज येणार संसदेत, लंडनमधील भाषणाबद्दल बोलणार का?
तुषार मेहतांनी नेमके काय सुचवले?
आमच्या एकूण १७ ते १८ मागण्या आहेत यामध्ये केंद्राच्या मागण्या चर्चेत असून महाराष्ट्र सरकारच्या पातळीवर सकारात्मक चर्चा झाल्याचे दिसून येत आहे. आमचा लॉंग मार्चच्या मागण्यानंतर आम्ही अंमलबजावणी होईपर्यंत चालत राहणार आहोत.तसा आमचा निश्चय असल्याचे शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळातील एका पदाधिकाऱ्याने सांगितले आहे. सरकारने जरी आम्हाला मोर्चा स्थगित करायला सांगितले तरी आम्ही आमच्या मागण्यांसंदर्भात जीआर बनवून कलेक्टर कडे पाठवून त्याच्या अंमलबजावणीला सुरवात झाली कि मग आमचे आंदोलन मागे घेऊ. आज फक्त आम्ही थांबतोय पण जोपर्यंत अंमलबाजवणी होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही. त्यामुळे यंत्रणा कामाला लागली अशी माहिती घरच्या लोकांकडून निरोप आल्यानंतर आम्ही लॉन्ग मोर्चा मागे घेणार आहोत.
पण यात दिरंगाई झाली आणि समजा अंमलबजावणी झाली नाही तर तो लॉंग मोर्चा हा मुंबईच्या दिशेला येईल. असा इशाराच शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने दिला आहे. आम्ही जर का मुंबईत आलो तर लोकांना खूप तक्लिफ होईल हि गोष्ट आम्ही सरकारला निक्षून पणे सांगितली आहे. आजच्यापुरते आम्ही हे आंदोलन थांबवत आहोत आमचा मोर्चा तूर्त थांबलेला आहे. वाशीम नावाच्या गावांत आम्ही थांबणार आहोत. जोपर्यंत अंमल बजावणी होत नाही सरकारची यंत्रणा तालुका पातळीवर काम करणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नसल्याचे सांगितले. ज्यादिवशी अंमल बजावणी होत नाही असे दिसेल त्यादिवशी आमचा मोर्चा पुन्हा मुबईच्या दिशेने निघणार असा इशाराच त्यांनी दिला आहे.