केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर महत्त्वाचा निर्णय दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा या निर्णयातून मिळाला असून पक्षाचे नाव आणि चिन्ह त्यांना मिळाले आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या गटाला आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाला तीन नावांचा आणि चिन्हांचा प्रस्ताव पाठवण्याचा आदेश देण्यात आला होता. यानुसार, निवडणूक आयोगाच्या या आदेशानुसार शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात तीन नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला. त्यातील एक नाव आता निवडण्यात आले आहे.
शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला तीन नावाचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यातील पहिलं नाव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी- शरद पवार, दुसरे नाव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार, तिसरे नाव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदराव पवार असे प्रस्ताव देण्यात आले होते. त्यामुळे आता यापैकी एक नाव निवडणूक आयोगाने निश्चित केले आहे. फक्त हे नाव आता २७ फेब्रुवारीपर्यंतच पक्षासोबत राहील. राज्यसभेच्या निवडणुकीपर्यंत ते राहील.
२७ फेब्रुवारीला राज्यसभेची निवडणूक होणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा शरद पवार गटाला नव्याने नावे पाठवावी लागतील.
दरम्यान, शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला तीन नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मात्र, अद्याप त्यांच्याकडून तीन चिन्हांचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला नाही. राज्यसभेच्या निवडणुकीला चिन्हाचा वापर होत नाही. त्यामुळे शरद पवार गटाकडून राज्यसभा निवडणुकीसाठी चिन्हाचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला नाही, असं म्हटलं जात आहे. त्यांना मिळत असलेलं नावही तात्पुरत असणार आहे.
हे ही वाचा:
इंग्रजांचा प्रभाव असलेली काँग्रेस आऊटडेटेड
नांदेड: धार्मिक कार्यक्रमात जेवणानंतर तब्बल २००० लोकांना अन्नातून विषबाधा!
ऑस्ट्रेलियातील खासदाराने भगवतगीतेच्या साक्षीने घेतली शपथ
कर्नाटक: खोदकामात सापडली राम लल्लासारखी प्राचीन विष्णू मूर्ती आणि शिवलिंग!
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर दिल्लीत शरद पवार गटाकडून शक्तिप्रदर्शन करण्यात आले, दिल्लीत ‘आमचा पक्ष, आमचं चिन्ह’ अशा अशयाची बॅनरबाजी करण्यात आली. तर, दुसरीकडे अजित पवार गटाकडून निकालानंतर आनंद व्यक्त करण्यात आला आहे.