पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या कामकाजाला सुरूवात

शेतकरी, महिला प्रश्न, किरीट सोमय्या कथित व्हिडिओ क्लिप हे मुद्दे गाजण्याची शक्यता

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या कामकाजाला सुरूवात

विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या कामकाजाला सकाळी ११ वाजता सुरुवात झाली असून हा दिवस विविध प्रश्नांवर गाजण्याची शक्यता आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी कथित व्हिडिओ क्लिप प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे. या मुद्द्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. तर, शेतकरी, महिला प्रश्न यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात होण्यापूर्वी विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. ‘शेतकरी विरोधी कलंकीत सरकार’ अशा आशयाचे पोस्टर धरून विरोधकांनी पायऱ्यांवर आंदोलन सुरू केले. तसेच शेतकरी प्रश्न, किरीट सोमय्या या मुद्द्यांवरूनही घोषणाबाजी केली. त्यानंतर पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या कामकाजाला सुरूवात झाली.

हे ही वाचा:

मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग; पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता

जगातील सर्वांत वाईट शहरांमध्ये पुन्हा कराची

कथित व्हिडीओ प्रकरणी किरीट सोमय्यांची चौकशीची मागणी

कोविड घोटाळ्याप्रकरणी एसआयटीकडून मुंबई महापालिकेत चौकशी

अंधेरी सबवे तुंबू नये यासाठी दीड किलोमीटरचा मायक्रो टनलिंग न तयार करता त्याच्या समोरेचं बांधकामं फ्री करून अंधेरी सबवेचं पाणी मिलानियर इमारतीच्या खाली टाकून अंधेरी सबवेला बंद होण्यापासून मुक्त करणार का? असा प्रश्न सभागृहात उपस्थित केला गेला आहे. तर, पाथरी येथील बसस्थानकातील स्लॅब कोसळून जखमी झालेल्या प्रवाशांना आर्थिक मदत देण्यासंदर्भातील मुद्दा अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला. भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षणाची सोय बारटीच्या माध्यमातून होण्याच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला. मात्र, या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याची तक्रार बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटील यांनी केली. तसेच हे हे प्रश्न राखून ठेवावेत अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.

Exit mobile version